घरमनोरंजनFilmfare Awards Ceremony : प्रकल्पानंतर महाराष्ट्रातून पुरस्कार सोहळाही पळवला, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

Filmfare Awards Ceremony : प्रकल्पानंतर महाराष्ट्रातून पुरस्कार सोहळाही पळवला, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

Subscribe

यंदाचा 69 वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2024 हा गुजरातच्या गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा 27 आणि 28 जानेवारी असा दोन दिवस असणार आहे.

मुंबई : बॉलिवूडचा प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत होतो. पण यंदाचा 69 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा गुजरातला होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. या मुद्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल करतच असतात. आता फिल्मफेअर पुरस्कार देखील गुजरातला होणार आहे. ‘फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय उत्तर द्यावे?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी केला आहे. यामुळे मुंबई विरूद्ध गुजरात असा वाद पुन्हा होणार आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्र्यासह राजकीय नेते मंडळी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

फिल्मफेअरसंदर्भात जयंत पाटील ट्वीट करत म्हणाले, “दरवर्षी मुंबई होणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आता गुजरातमध्ये होणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले. आता फिल्मफेअर पुरस्कार सोहळा देखील पळवला गेला. फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोत्रावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय उत्तर द्यावे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray Group Press : कायद्यामध्ये विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही; विधिज्ञ असिम सरोदेंचा खुलासा

- Advertisement -

फिल्मफेअरचे सूत्रसंचालन करण्यासाठी खूप आतुर – करण जोहर

फिल्मफेअरच्या वतीने सोमवारी (15 जानेवारी) जियो वर्ल्ड सेंटर येथे आजोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून पुरस्कार सोहळा गुजरातला होणार आहे, अशी माहिती दिली आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी, प्रसिद्ध फिल्म निर्माता करण जोहर आणि अभिनेता वरुण धवन उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना करण जोहर म्हणाले, “मी फिल्मफेअरचे सूत्रसंचालन करण्यासाठी खूप आतुर आहे. मला गुजरातला जाऊन तेथील संस्कृती, परंपरा, सशक्तीकरण आणि आर्थिक विकास असलेल्या भूमीवर फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होणार आहे.”

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेतून कोणता गौप्यस्फोट होणार? उत्सुकता शिगेला

असे असणार फिल्मफेअर पुरस्कार सोहळा

यंदाचा 69 वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2024 हा गुजरातच्या गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे होणार आहे. हा पुरस्कार सोहळा 27 आणि 28 जानेवारी असा दोन दिवस असणार आहे. यंदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेतारका या गुजरातमध्ये दिसणार आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळा हा ‘गुजरात टुरिझम’च्या सहकार्याने होणार आहे. आतापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार सोहळाहा महाराष्ट्रातच झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -