घरमुंबईभिवंडीत काळ्या काचांवर फिल्म लावून फिरतायेत सर्रास गाड्या

भिवंडीत काळ्या काचांवर फिल्म लावून फिरतायेत सर्रास गाड्या

Subscribe

भिवंडीत चारचाकी वाहनांवर काळ्या काचा आणि गाड्यांच्या दरवाजावरील काचांना ‘ब्लॅक (काळी) फिल्म’ लावण्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. त्यानूसार परिवहन मंत्रालयाने कायद्याने बंदी घातली आहे. मात्र असे असताना शासन व न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता शेकडो चारचाकी वाहने अद्यापही तशा स्थितीत भिवंडी शहर परिसरात राजरोसपणे फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यातील बहुतांश गाड्या राजकीय पक्षाच्या पुढारी तसेच पदाधिकाऱ्यांच्या असल्याने पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. सद्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे काचेवर काळ्या फिल्म लावून अनेक जण सर्वत्र फिरत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे धोक्याचे आहे. त्यामुळे अशा वाहनांवर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वाहनांच्या दरवाजाच्या खिडकीवर असलेल्या काचांवर काळी फिल्म लावून काही समाजकंटक गुन्हे करत असल्याचे अनेकवेळा निदर्शनात आलेले आहे. काचेवर काळी फिल्म लावल्यामुळे आत कोण बसले आहे, ते काय करत आहेत, हे दिसून येत नाही. त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती घेत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. खून, अनैतिक संबंध, दरोडा यासोबतच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांनी काळ्या काचांचा आडोसा घेतला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे काळ्या काचा लावून फिरणाऱ्या फिल्मिंगवर बंदी आणण्याबाबत सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने देशातील अशा सर्व फिल्मिंग तातडीने उतरवण्याचा आणि त्या बसवण्याला प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार सर्व पोलीस आयुक्त व अधिक्षकांना काळ्या काचांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले होते. त्यामुळे कल्याण व भिवंडीत तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या आदेशाने पोलीस पथकाने कडक मोहीम राबवून कडक कारवाई केली होती.

- Advertisement -

मात्र, सध्या ठाणे भिवंडीसह सर्वच ठिकाणी ही मोहिम ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक वाहनांवरील काचेवर काळ्या फिल्म लावून गाडी चालक, मालक निर्धास्तपणे फिरत आहेत. न्यायालय व शासन निर्देशानंतर राज्यामध्ये काळ्या काचांची वाहने दिसणे अपेक्षित नव्हते. मात्र तरीही बऱ्याच वाहनांवर काळ्या काचा आढळून येतात. खासगी व्यक्तींबरोबरच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शासकीय तसेच निमशासकीय वाहनांच्या काचांनाही अशा प्रकारे फिल्मिंग लावलेली वाहन सर्वत्र फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. असे असताना गाड्यांवर काळया फिल्म लावून फिरणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे समोर आल्याने मोटर वाहन कायद्यानुसार वाहनांच्या काचांवर लावण्यात आलेल्या काळ्या फिल्म तत्काळ काढण्यााची विशेष मोहिम भिवंडीत राबवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे.

हेही वाचा –

शिखर बँक घोटाळ्यात शरद पवार, अजित पवारांसह ७० संचालकांवर ईडीचे गुन्हे दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -