घरमनोरंजन'ही' अभिनेत्री दिसणार हिरकणीच्या भुमिकेत!

‘ही’ अभिनेत्री दिसणार हिरकणीच्या भुमिकेत!

Subscribe

अभिनेता प्रसाद ओक लवकरच एका सुंदर विषयावर चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे हिरकणी. शिवाजी महाराजांच्या रायगडाचे गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे आपल्या घरी असलेल्या बळासाठी हिरकणी गडाच्या एका बुरूजावरून खाली उतरली होती. यानंतर शिवाजी महाराजांनी त्या बुरूजाला हिरकणी बुरूज असे नाव ठेवले. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मुलासाठी हिरकणी उचलेले हे पाऊल पुन्हा एकदा आई आईच असते हे सिध्द केलं होतं. आता या चित्रपटात हिरकणीची भुमिका कोण साकारणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. अखेर मराठी चित्रपटसृष्टीची हिरकणी सगळ्यांसमोर आली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीच्या भुमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

आई भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण… महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" येत्या दिवाळीत…२४ ऑक्टोबर रोजी #हिरकणी #Hirkani #24Oct @iradaentertainment in association with @mapuskar (MAGIJ Picture) Presents @hirkanithefilm @chinmay_d_mandlekar @oakprasad #lawrencedsouza #falgunipatel

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

- Advertisement -

मातृदिना दिवशी अभिनेता,दिग्दर्शक प्रसाद ओकने ‘हिरकणी’ या आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशलमिडीयावर शेअर केला आणि चित्रपटाची उस्तुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. काही दिवसांपूर्वीच ‘हिरकणी’चं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं.त्यानंतर या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे गीत प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये नऊ कलाकार सहा लोककलांमधून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देण्यात आला आहे.

- Advertisement -

सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी आणि असेच अनेक गाजलेले मराठी चित्रपट तिच्या नावावर आहेत. ‘विक्की वेलिंगकर’ संपूर्ण महाराष्ट्र ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी या चित्रपटात मुख्य भुमिकेसाठी सोनालीची वर्णी लागली आहे.

View this post on Instagram

आई भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण… महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" येत्या दिवाळीत…२४ ऑक्टोबर रोजी #हिरकणी #Hirkani #24Oct @iradaentertainment in association with @mapuskar (MAGIJ Picture) Presents @hirkanithefilm @chinmay_d_mandlekar @oakprasad Lawrence D'Souza #FalguniPatel

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी पेलली आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -