घरमुंबईउल्हासनगरमध्ये फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षा; अनुदानित शाळेकडून फी वसुली

उल्हासनगरमध्ये फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षा; अनुदानित शाळेकडून फी वसुली

Subscribe

अंबरनाथ येथील टी. एम. एस. हायस्कुल या अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली जात आहे. राईट टू एज्यूकेशन (आरटीई) अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील फी भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

अंबरनाथ येथील टी. एम. एस. हायस्कुल या अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली जात आहे. राईट टू एज्यूकेशन (आरटीई) अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील फी भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रारी देखील करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे. या शाळेत जवळपास १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत या शाळेला शासनाकडून अनुदान मिळाले आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांकडून फी वसूल केले जात आहे.

फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षा

आरटीई अंतर्गत (बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) यंदा ७३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या दोन्ही गटात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा प्रशासन फी भरण्याची सक्ती करत आहे. फीसाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करणे, इतर विद्यार्थ्यांसमोर त्यांचा अपमान करणे, पालकांशी उद्धटपणे वागणे असे प्रकार केला जात असल्याचा आरोप काही पालक आणि सामाजिक संघटनेने केला आहे. यासंबंधी अंबरनाथच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत.

शासकीय अनुदान घेणाऱ्या शाळेने विद्यार्थ्यांकडून फी घेऊ नये, असे शासनाचे आदेश असून देखील टी. एम. एस. शाळा विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरून बेकायदेशीररित्या फी वसुली करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. याप्रकरणी मी संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या आहेत.
– राकेश देशमुख (अध्यक्ष, शिक्षण युवा – जन अधिकार संघटना)
- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा निवडणूक काळात राज्यात ३ कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

ज्या शाळेला 100 टक्के अनुदान प्राप्त होत आहे त्या शाळेने अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून फी घेणे अयोग्य आहे .
– रा. ध. जतकर ( गट शिक्षण अधिकारी अंबरनाथ)

शाळेने फेटाळला पालकांचा आरोप

दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पालकांचे हे आरोप फेटाळले आहेत. ‘विद्यार्थ्यांना आणि पालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही. आरटीई अंतर्गत एकूण ७३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. आम्ही त्यांना नाममात्र फी भरण्यास सांगितले. यांपैकी ६८ विद्यार्थ्यांच्या पालकांशी आम्ही चर्चा करून तो प्रश्न सोडविला आहे. फक्त ५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी काहीच फी न भरण्याचा आडमुठेपणा केला आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून आम्ही संगणक प्रशिक्षण आणि शैक्षणिक साहित्य यासाठी माफक फी घेतो. आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या जवळपास २०० विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी फी माफ करीत असतो’, असे शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा मॅडम म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -