Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई गोरेगावच्या भीषण आगीत सात दुकानं जळून खाक

गोरेगावच्या भीषण आगीत सात दुकानं जळून खाक

Related Story

- Advertisement -

भांडुप, प्रभादेवी, कुर्ला येथील आगीच्या घटना एकामागोमाग एक घडल्या असतानाच मंगळवारी सकाळी गोरेगाव येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली. गोरेगाव पश्चिम भागातील गणेश टिंबर दुकानाजवळ ही भीषण आग लागली आहे.  या आगीत ७ कपड्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 फायर इंजिन्स आणि वॉटर टॅन्क्स दाखल झाल्या आहेत. यानंतर अवघ्या काही तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीमागचे नेमके अद्याप अस्पष्ट आहे. मात्र यावेळी आग विझविताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव ( प.), स्टेशन रोड, रोलिंग शॉपिंग सेंटर येथील एका दुकानाला मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, फायर इंजिन व वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने या आगीवर दुपारी १२.३२ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवून आग विझविली.या घटनेत दोन, तीन दुकाने जळाली आहेत. त्यामुळे वित्तीय हानी झाली आहे.तसेच, आग विझविण्याचे काम करीत असताना अग्निशमन दलाचे दोन जवान अमृत गायकवाड (४०) आणि अनिल कुमार (३०) हे दोघेजण जखमी झाले आहेत. गायकवाड यांना तात्काळ नजीकच्या नर्सिंग होममध्ये उपचार करण्यात आले व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अनिल कुमार यांच्यावर कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मात्र या आगीत ७ दुकांनाचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे अनेक दुकानांमधील कपड्यांचा माल जळून खाक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गोरेगावमध्येही यापूर्वी आगीची घटना समोर आली होती. तर काही दिवसांपूर्वी भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढतचं आहेत. या आगीच्या घटना शॉर्ट सर्किट, सिगारेट किंवा काही ज्वलनशील पदार्थ, केमिकलमुळे घडल्याचे अनेकदा समोर आले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -