Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मंगळवेढा पोटनिवडणूक, लोकांच्या मनातील सरकारविरोधी उद्रेक मताच्या रुपाने व्यक्त होईल - चंद्रकांत...

मंगळवेढा पोटनिवडणूक, लोकांच्या मनातील सरकारविरोधी उद्रेक मताच्या रुपाने व्यक्त होईल – चंद्रकांत पाटील

केंद्राने पॅकेज दिले नसते तर भूखबळी जास्त गेले असते

Related Story

- Advertisement -

भाजपने समाधान औताडे यांना पोटनिवडणूकीची उमेदवारी दिली आहे. पुर्ण ताकदीनी आम्ही ही निवडणूक लढणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी एकत्र असली तरी राज्यात चाललेली बोंबाबोंब सगळ्यांनाच माहिती आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न हा ऐरणीवर आहे. राज्यात लाखो शेतकऱ्यांना वीज खंडित करण्याबाबतची नोटीस गेली आहे. त्यातील काही लाख या जिल्ह्यात तर मतदारसंघातील हजारो शेतकरी आहेत. स्थानिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येणार आहे.

पोटनिवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवणार असून नागरिकांना आम्ही आवाहन करणार आहोत. त्यांना सागणार आहोत की, आमच्या काळात तुमची कधीही वीज जोडणी खंडीत केली नाही. पिकांना पाण्यासाठी कधीही वीज कमी पडून दिली नही. आम्ही २५ हजार कर्जमाफी दिली या सरकारने तुम्हाला काय दिले. त्यामुळे ते सरकार आणि ह्या सरकारमध्ये फरक समजत आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक आम्ही नक्की जिंकू आणि लोकांच्या मनातील उद्रेक हा मताच्या रुपाने व्यक्त होईल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवार आणि अमित शाह यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त राष्ट्रवादीकडून फेटाळण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे राष्ट्रवादीकडून बोलले जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, ही अफवा असे तर चांगलेच त्यात अस्वस्थ होण्याचे त्यांना काही कारण नाही. तसेच मी आजारी नाही हे सांगावे लागत नाही. जर एखादा अजारी नसेल तर त्याला अधूम मधून सांगावे लागत असेल मी आजारी नाही, मी आजारी नाही. त्यामुळे जर सरकार स्थिर आहे तर सांगण्याची अवश्यकता नाही. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बैठक झाली की नाही याबाबत मला माहित नाही. या वृत्ताला आम्ही दुजोरा दिला नाही.

केंद्राने पॅकेज दिले नसते तर भूखबळी जास्त गेले असते

आमचा लॉकडाऊन करण्यास विरोध नाही परंतु लॉकडाऊन करण्यापूर्वी असंघटीत कामगारांचा विचार करा असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर असंघटीत कामगारांचा विचार करावा, राज्य सरकारने असंघटीत कामगारांना पहिली आर्थिक मदत करावी. योग्य मुद्द्यावर सगळेच विरोध करतात पुन्हा लॉकडाऊनवर सगळेच विरोध करत आहेत. कारण राज्य सरकारने असंघटीक कामगार जो आहे. केळी विकणारा, भाजी विकणारा अशा अनेकांना काही मदत केली नाही. केंद्र सरकारने कोरोना काळात मोफत रेशन दिले नसते तर कोरोनाबळी पेक्षा भूकबळीने अधिकांचे प्राण गेले असते असते.

- Advertisement -