घरमुंबईविरारमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीचं कारण स्पष्ट; मृतांची यादी समोर

विरारमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीचं कारण स्पष्ट; मृतांची यादी समोर

Subscribe

रुग्णालयात अग्नितांडव! १३ रुग्णांचा मृत्यू

नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात ५ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. विरार पश्चिम येथील चार मजली विजय वल्लभ या हॉस्पिटलमध्ये ९० रुग्ण उपचार घेत होते. त्यातील १७ कोरोनाबाधित रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते.

रुग्णांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय?

पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील  अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटातच आगीने अतिदक्षता विभागात आगीचे तांडव झाले. आग लागली तेव्हा त्याठिकाणी १७ रुग्ण होते. आग लागल्यावर डॉक्टर आणि कर्मचारी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. चार रुग्णांना वाचवण्यात यश आले. पण, आगीत १३ रुग्ण दगावले आहेत.  दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १९ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर  नियंत्रण मिळवले आहे. यावेळी ९० रुग्ण उपचार घेत होते. बचावलेल्या सर्व  रुग्णांना वसईतील इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू?

आगीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी याठिकाणी जमल्यानंतर आक्रोश केला होता. त्यांनी रुग्णालयाच्या  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. १३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. इतर रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात येणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शाह यांनी दिली. तर या आगीची माहिती  मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, महापालिका आयुक्त गंगाधरन डी. आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आगीत मृत्य पावलेल्या रुग्णांची नावे.

1. उमा सुरेश करगुंटकर (६३, महिला)

- Advertisement -

2. निलेश भोईर (३५, पुरुष)

3. पुखराज वैष्णव (६८, पुरुष)

4. रजनी कडू (६०, महिला)

5. नरेंद्र शंकर शिंदे (५८, पुरुष)

6. कुमार किशोर दोशी (४५, पुरुष)

7.जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (६३, पुरुष)

8. रमेश उपायन (५५, पुरुष)

9. प्रवीण गौडा (५५, पुरुष)

10. उमेश राजेश राऊत (२३, पुरुष)

11. शमा अरुण म्हात्रे (४८, महिला)

12.सुवर्णा पितळे (६४, महिला)

13. सुप्रिया देशमुख (४३, महिला)

14. शिवाजी वीरकर ( वय 56 )

  • विरार प्रतिनिधी- शशी कर्पे

विरारच्या कोविड रूग्णालयात AC चा स्फोट; १३ जणांचा होरपळून मृत्यू
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -