घरमुंबईडोंबिवलीत झेनिथ कंपनीला भीषण आग

डोंबिवलीत झेनिथ कंपनीला भीषण आग

Subscribe

डोंबिवली येथील झेनिथ कंपनीला मंगळवारी भीषण आग लागली आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप समजले नसून याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीमधील एमआयडीसी फेज १ येथील ‘झेनिथ’ कंपनीला मंगळवारी मध्य रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ही कंपनी डोंबिवली येथील एमआयडीसी फेज १ जवळ आहे. सदर कंपनी रबर बनवण्याची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशामन दलाला आग लागल्याची खबर मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होते आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले. मध्यरात्री आग विझवण्यात अग्निशामन दलाला यश आले. मध्यरात्री आग लागल्यामुळे कंपनीमध्ये लोकांचा वावर नव्हता. यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या 

वाचा – अंधेरीत कमर्शिअल बिल्डींगला आग, जीवितहानी नाही

वाचा – आग विझवण्यासाठी ९२ लाखांचा रोबोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -