घरताज्या घडामोडीBreaking - शिवसेना उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

Breaking – शिवसेना उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

Subscribe

शिवसेना उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत शेखर जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मुंबईतील विक्रोळी परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळी परिसरातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर काही अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत शेखर जाधव जखमी झाले असून त्यांना उपचाकरता गोजरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शेखर जाधव जखमी

विक्रोळीतील टागोरनगर मधील साई मंदिर परिसरात आज (गुरुवारी) सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास हा हल्ला घडला. या हल्ल्यात जाधव यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जाधव यांच्यावर एका २२ वर्षीय तरुणाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. अभय विक्रम सिंग असे या हल्लेखोराचे नाव असून हा तरुण मूळ अलाहाबादचा असल्याचे म्हटले जात आहे. नागरीकांनी त्यास पकडून मारहाण केली असल्याने तो जखमी झाला असल्याने त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सदर गोळीबारात वापरले गेलेले रिव्हाॅलवर जप्त करण्यात आले.

- Advertisement -

जाधव यांना येत होत्या धमक्या

गेल्या काही दिवसांपासून शेखर जाधव यांना धमक्या येत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, हल्ल्याचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेखर जाधव हे शिवसेना उपविभागप्रमुख म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. भरसकाळी भरवस्तीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे विक्रोळीतील टागोर नगर परिसरात घबराट पसरली आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.


हेही वाचा – मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -