घरमुंबईवर्सोवा समुद्रात बुडालेल्या तीन मुलांना वाचवले, एक अजूनही बेपत्ता

वर्सोवा समुद्रात बुडालेल्या तीन मुलांना वाचवले, एक अजूनही बेपत्ता

Subscribe

अंधेरी येथील वर्सोवा समुद्रात पोहायला गेलेले पाच लहान मुले बुडाले असून त्यापैकी चौघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एक मुलगा कूपर रुग्णालयात उपचार घेत आहे. वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पाच मुले वर्सोवा जेट्टी लगतच्या समुद्र किनारी पोहण्यास गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी तिथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाश्यांनी मुलांना वाचवले.

आयुष खंडू रईदर (१३), हर्ष कोळी (१२), रिहान अन्सारी (१३) आणि वैभव गौड (१३) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी वैभव गौड हा मुलगा अद्यापही भेटलेला नाही. फायरब्रिगेड आणि सागरी पोलीस ठाण्याच्या मदतीने शोध कार्य चालू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -