घरमुंबईकॅन्टोन्मेंट बोर्डाचे चार सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चार सदस्य करणार भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असलेले सुरेश कांबळे, अभय सावंत, कमलेश चासकर आणि दुर्योधन भापकर यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. लवकरच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने त्यांचा पक्षप्रवेश होणार आहेत. येत्या एक दोन दिवसांत हे चौघेही भाजपात प्रवेश करतील. आज कॉंग्रेस भवन येथे जाऊन या चारही सदस्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. यापैकी सुरेश कांबळे, अभय सावंत, कमलेश चासकर हे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य आहेत तर दुर्योधन भापकर हे उपाध्यक्ष आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -