घरमुंबईतेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे रुपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर

तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे रुपयांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर

Subscribe

महिलेचा तरुणाला गंडा

तेल गेले, तूप गेले, हाती आले धुपाटणे, अशा कथेसारखा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. भारतीय चलनी रुपयांच्या बदल्यात जादा किंमतीचे अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने खारघरमधील तरुणाची १ लाख रुपयांना फसवणूक केली. यामुळे जादा पैशांचा हव्यासातून ‘रुपये गेले, डॉलर गेले हाती आले कागद’ असे म्हणण्याची वेळ या तरुणावर आली आहे.

श्रवणकुमार भोमराज मेवाडा (३३) हे साईप्रेरणा सोसायटी, सेक्टर 12, खारघर, येथे राहत असून त्यांचा कापड विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात एक अनोळखी महिला आली. या महिलेने तिच्याकडे अमेरिकन डॉलर असल्याचे सांगून ते विकायचे असल्याचे सांगितले. मेवाडा हे 1 लाख रुपये घेऊन कोपरी गांव, नवी मुंबई येथे त्या महिलेला भेटण्यासाठी गेले. त्यावेळेस त्यांना या पत्त्यावर दोन इसम भेटले. त्यावेळेस त्यांनी मेवाडा यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. तसेच मेवाडा यांच्या हातात रुमालात बांधलेले कथित डॉलरचे गाठोडे दिले. त्यावेळेस मेवाडा यांनी ते डॉलर बांधलेले गाठोडे त्याच ठिकाणी खोलण्याचा प्रयत्न केला, त्यावर या तरुणांनी इथं पाहू नका, घरी जाऊन पहा असा बनाव केला. त्यानंतर मेवाडा हे त्या ठिकाणाहून निघून गेले आणि दुसरीकडे रुमाल उघडून पाहिले असता त्यात कागदाचा गठ्ठा आढळून आला. त्यानंतर मेवाडा यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -