घरमुंबईधावत्या लोकलमध्ये मिळणार मोफत वायफाय सेवा

धावत्या लोकलमध्ये मिळणार मोफत वायफाय सेवा

Subscribe

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायसोबतच आता धावत्या लोकल ट्रेनमध्ये सुद्धा वायफाय सुविधा मिळणार आहे. नुकतेच मध्य रेल्वेने धावत्या लोकलमध्ये वायफायची चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे येत्या जुलै महिन्यापासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना धावत्या लोकलमध्ये वायफाय सुविधा मिळणार आहे.

मुंबईच्या जीवन वाहिनी असलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवासात मुंबईकरांचा बराच वेळ जातो. लोकलमध्ये मोबाईलच्या नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे प्रवाशांची कामेही खोळंबतात. ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने धावत्या लोकलमध्ये वायफाय सेवा देण्याची योजना आखलेली आहे. मध्य रेल्वेकडून स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. गाणी डाऊनलोड करणे, चित्रपट पाहणे तसेच मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर साहित्य डाऊनलोड करण्यावर प्रवाशांचा खूप जास्त भर आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वेने प्रवासी सुविधेसाठी धावत्या लोकलमध्येही वायफायची सुविधा देण्याचे प्रयत्न सुरु केले. धावत्या रेल्वेमध्ये वायफायची सेवा देण्याचा भारतीय रेल्वेत हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये तांत्रिक चाचणी सुरु आहे. त्याच्यातील काही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. थोडे काम बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात ही सेवा सुरु होण्यासाठी किमान ४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

प्रवाशांचे होणार मनोरंजन

- Advertisement -

वायफाय हॉटस्पॉटमुळे प्रवासी चालत्या लोकलमध्ये स्वत:चे मनोरंजन करून घेऊ शकतील. त्यासाठी प्रवाशांंना मोबाईल अ‍ॅपल्किेशन डाउनलोड करावे लागणार आहे. ही सेवा रेल्वेतर्फे विनामुल्य देण्यात येणार आहे. धावत्या लोकलमध्ये वायफाय सुरू झाल्यास रेल्वे स्थानकांपेक्षा या प्रयोगाला सर्वाधिक प्रतिसाद मिळेल अशी शक्यता रेल्वे अधिकार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वायफाय आणि हॉटस्पॉटवर जाहिरातील देऊन महसूल जमा करण्याच्या रेल्वेच्या मानस आहे.

धावत्या लोकलमध्ये वायफायची सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सद्या काही तांत्रिक चाचण्या सुरु आहेत. या चाचण्या पूर्ण होताच तातडीने निविदा काढण्यात येणार आहेत.
-ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -