घरमुंबईपाच राज्यांच्या निवडणूक निकालावर सेना-भाजप युतीचे भवितव्य अवलंबून

पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर सेना-भाजप युतीचे भवितव्य अवलंबून

Subscribe

प्रतिनिधी:- आगामी निवडणुकीआधी शिवसेना-भाजपत युती होईल की नाही, हे आज कोणीही सांगत नसले तरी होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर युतीचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपच्या वाट्याला अपयश आले तर युती होण्याची शक्यता नाही, यश मिळाल्यास युती होऊ शकते, असे सेना नेते बोलू लागले आहेत. भाजपबरोबर युती न करण्याचा पवित्रा शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. यामुळेच ते भाजपवर उघडपणे टीका करत आहेत. विशेष म्हणजे युती व्हावी, म्हणून भाजपच्या नेत्यांनी सेनेच्या टीकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनीही युतीची गरज व्यक्त करताना युतीअभावी यशाचा मार्ग खडतर असल्याचे उघड करून सांगितले आहे.

राज्यात युतीने सत्ता राबवली जात असताना भाजपने संधी मिळेल तेव्हा शिवसेनेचा अवमान केला. याशिवाय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा भाजपचे फुटकळ नेतेही अवमान करत होते. यामुळे भाजपशी युती नको, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी घेतला होता. याचा फटका भाजपला सर्वाधिक बसण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या पक्षाचे सगळेच नेते युतीसाठी घायकुतीला आले आहेत. येनकेन प्रकारेन युती व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्यात गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या महामंडळांचे गठन करून शिवसेनेकडे महत्वाची महामंडळे देण्याचा निर्णय घेतला. यामुळे सेनेचे मन वळेल आणि ते निवडणुकीत युतीचा निर्णय घेतील, अशी भाजपची अटकळ होती. मात्री ती फोल ठरली. उध्दव ठाकरेंबरेाबरच आता संजय राऊत आणि रामदास कदम हे नेतेही भाजप नेतृत्वावर जहरी टीका करू लागले आहेत.

- Advertisement -

युती करण्यात दोन्ही पक्षांचा फायदा असला तरी भाजपची अवस्था खूप काही चांगली आहे असे नाही. भाजपच्या हाती असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपची स्थिती बिघडली आहे. राजस्थान तर गेल्यात जमा आहे, असे तिथले वातावरण आहे. अशा निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपचा पाडाव झाल्यास त्या पक्षाच्या बरोबर जाण्यात काहीही फायदा नाही, उलट नकारात्मक मतांचा फटका सेनेला बसू शकेल, हे लक्षात घेऊन पराभव झाल्यास महाराष्ट्रात युती नको, अशी भूमिका पक्षाच्या अनेक नेत्यांची आहे. दुसरीकडे टीकेच्या जंजाळातही भाजपला पाच राज्यांमध्ये यश मिळाल्यास महाराष्ट्रात युतीशिवाय एकाकी लढणे ही अवघड बाब ठरू शकते, हे लक्षात घेऊनच युतीचा निर्णय घेतला जाईल, असे सेनेच्या सुत्रांनी स्पष्ट केले.

युती व्हावी ही श्रींची इच्छा!

आमच्या पक्षाची विचारधारा आणि सेनेची विचारधारा ही एकसारखी आहे. यामुळे युती होईल ती सेनेबरोबरच. आमचा पक्ष यासाठी आग्रही आहेच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह सर्वाधिक आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने भाजपबरोबर रहावे, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यांना यात यश येईल, यात शंका नाही, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -