घरफिचर्सबदामी गावातिल बनशंकरी शाकंबरी देवी दर्शन

बदामी गावातिल बनशंकरी शाकंबरी देवी दर्शन

Subscribe

पावसाळा नुकताच संपला होता, ऑक्टोबर हिटच्या झळा लागण्यास सुरुवात झालेली. याआधी कधी लहानपणी वडिलांसोबत बनशंकरी शाकंबरी ह्या माझ्या कुलदेवतेला गेल्याचे धुरकट स्मरणात होते. या वर्षी शोधत शोधत का होईना पण त्या देवीच्या दर्शनाला जायचे असा मनाशी चंग बांधून बॅग भरली. गिर्यारोहणाचा दांडगा अनुभव असल्याने घरातून निघाल्यानंतर ते परत घरी येईपर्यंतचा सगळा प्लॅन कागदावर उतरवला होताच.

आत्तापर्यंत गिर्यारोहणामुळे महाराष्ट्रभर फिरण्याची सवय झाली होती पण हा प्रवास मात्र सीमोल्लंघन करणारा होता कारण ते मंदिर होते महाराष्ट्राबाहेर कर्नाटकातील बदामी या गावी. हे गाव प्रसिद्ध आहे ते तिथल्या लेण्यांसाठी
इथल्या वाळूच्या दगडात कोरलेल्या मुर्त्या आणि देखणं नक्षीकाम अगदी नेत्रदिपक.

- Advertisement -

प्रवासात जोपर्यंत अडथळे येत नाहीत तोपर्यंत तो प्रवास लक्षात राहत नाही असं म्हणतात. माझ्यापुढेही ह्या प्रवासात दोन मोठे अडथळे होते. पहिला म्हणजे हे मंदिर कर्नाटकात असल्याने तिथली भाषा. त्यांचा त्यांच्या भाषेवर इतकं प्रेम आहे की ते मराठी माणसासारखी हिंदी भाषा शिकायचा आटापिटा करत नाहीत. त्यामुळे आमच्या सारख्या नवख्या माणसाला तिथे जाणं म्हणजे महादिव्यच. आणि दुसरा अडथळा म्हणजे आपली लालपरी एस टी आज रागावली होती आणि अख्ख्या महाराष्ट्रभर संप पुकारण्यात आला होता.

महाराष्ट्रात येणार्‍या बाहेरच्या राज्यातल्या सरकारी बसेस आणि बाहेर राज्यात जाणार्‍या बसेस सर्व बंद. अशा अनुकूल परिस्थितीचा लाभ घ्यायला मराठी माणसाला सांगायला लागत नाही याचा प्रत्यय मला कोल्हापुरात आला. कोल्हापूर ते निपाणी हे ४० किमीचं अंतराला एरवी ५० रुपये घेण्यार्‍या खासगी जीपवाल्यांनी, संप जाहीर झाल्यानंतर ताशी ३० रुपये या प्रमाणे भाव वाढवत नेत तो तब्बल ४०० रुपये पर्यंत नेला. मी मात्र माझी कन्फर्म असलेली रेल्वेची तिकीट त्यांना दाखवत ताठ मानेने सरळ रेल्वे स्टेशन गाठले आणि बदामीडे जायला निघालो.

- Advertisement -

पहाटे बदामी स्टेशन आले. भाषेचा अभाव असला तरी तुटक तुटक हिंदी बोलत एका रिक्षावाल्याने मला मंदिरापाशी आणून सोडले. या छोट्याशा प्रवासात त्याने मला मंदिराची मार्चमध्ये कशी मोठी जत्रा भरते हे त्याला जसं जमेल तसं हिंदीत सांगितले. मीही त्याचा मान राखत मला जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घेतलं.

सकाळ होईपर्यंत मंदिरातच एक झोप घेतली आणि सकाळी थंड पाण्याने शाही स्नान घेऊन गाभार्‍यात प्रवेश केला. १० पुजारी मंत्रोच्चारासह देवीच्या पूजेला लागले आणि बघता बघता देवीला स्नान घालून तिला अगदी नव्या नवरीसारखी सजवण्यात आले. मुंबई ते कर्नाटकपर्यंतचा प्रवास तिचे ते मनमोहक रूप बघून पावन झाल्याचे समाधान चेहर्‍यावर उमटले.

देवीची छोटी प्रतिकृती मूर्ती घेऊन पुन्हा मुंबईकडे रेल्वेने रवाना झालो.


– विशाल निर्लेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -