घरमुंबई‘अखेर’ दिवा रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका

‘अखेर’ दिवा रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका

Subscribe

स्लग- ‘महानगर’ च्या वृत्तानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना आली जाग

दिवा रेल्वे स्थानकावर जखमी आणि मृत प्रवाशांची होणारी अवहेलना आता लवकरच थांबणार आहे. येथील जखमी आणि मृतांना रुग्णवाहिका नसल्याचे वृत्त गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. महानगरच्या या वृत्ताची दखल अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली असून त्यांनी याठिकाणी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करुन दिली आहे. दैनिक आपलं महानगरने या वृत्ताचा पाठपुरावा केल्यानेच आज ही रुग्णवाहिका मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरसारख्या स्थानकांमध्ये अपघातात जखमी,गंभीर जखमी तसेच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध नव्हती.त्यामुळे गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांचा मृत्यू देखील होत होता. या महिन्यात सुरूवातीला दिवा-आगासन मार्गावर मृत्युमुखी पडलेल्या एका प्रवाशाला चक्क टेम्पोतून स्थानकापर्यंत न्यावे लागले होते. तर नुकतेच कोकणकन्या एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू पावलेल्या एका प्रवाशाच्या मृतदेह दिवा-ठाणे लोकलमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा लागला होता. त्यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के शर्मा यांनी रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असे सांगितले.तसेच रेल्वेकडून राज्य सरकारला पत्रव्यवहार सुद्धा केले आहेत. लवकरच १०८ रुग्णवाहिका दिवा रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतली दखल

गेली चार वर्षे या समस्येची दखल घेतली जात नव्हती. मात्र दैनिक ‘आपलं महानगर’ सोबत इतर माध्यमांनी रुग्णवाहिकाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहेत. दिवा रेल्वे स्थानकावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदार निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच या रेल्वे स्थानकांवर १०८ ची सुद्धा रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध होणार होणार आहे.

आम्ही दिवा रेल्वे स्थानकावर रुग्णवाहिका मिळावी यासाठी मागील कित्येक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र याकडे लक्ष दिले जात नव्हते. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला त्यामुळे आज रुग्णवाहिकेची सोय झाली आहेत. परंतु, रुग्णवाहिकाला येण्यासाठी विलंब लागला या गोष्टीचा खेद वाटतो.

- Advertisement -

अ‍ॅड. आदेश भगत, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -