घरमुंबईसोशल मीडियाच्या कचाट्यात गणेशोत्सव मंडळे

सोशल मीडियाच्या कचाट्यात गणेशोत्सव मंडळे

Subscribe

- जाणीवपूर्वक केली जातेय बदनामी,- चिंचपोकळीचे चिंतामणी मंडळ पोलिसांच्या दरबारी

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी तयारीचा वेग वाढविला आहे. आपल्या मंडळाची विविध माहिती, कार्यक्रम आणि आगमन सोहळ्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी सध्या मंडळांमध्ये सोशल नेटवर्किंग साईटचा वापर वाढला आहे. मात्र आता या सोशल नेटवर्किंग साईटच गणेशोत्सव मंडळांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक सार्वजनिक मंडळांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग केले जात असून यामध्ये मुंबईतील अनेक नामांकित मंडळाचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गणेशोत्सव मंडळांनी आता थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. यंदा १०० वर्ष साजरे करीत असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक गणशोत्सव मंडळ देखील यातून सुटलेले नसल्याचे एक प्रकरण नुकतेच समोर आले असून यासाठी मंडळाने देखील कंबर कसली आहे.

काही वर्षांपासून या मंडळामध्ये सोशल नेटवर्किंगचा वापर करणे, पाद्यपूजन सोहळाचे आयोजन करणे, मोठ्या प्रमाणात आगमन सोहळा आयोजित करणे यासारख्या कार्यक्रमांना अधिक प्रमाणात पसंती दिली जाते. यातील सोशल नेटवर्किंग वरील प्रचारासाठी तर अनेक मंडळांनी स्वत:ची अशी विशेष टीम देखील तैनात केली आहे. या सोशल मीडियाचा वापर करुन मंडळांनी आपले आगमन सोहळ्याचे फोटो, इतर माहिती ट्टिवरट, फेसबुर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करीत आपले वैविध्यपण जपण्याचा देखील प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरु केला आहे. परंतु यंदा गणेशोत्सव मंडळांसाठी सोशल नेटवर्किंग साईट डोकेदुखी ठरत असल्याचे मत मुंबईत सार्वजनिक मंडळांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

फेसबुकच्या माध्यमातून अनेकजण सध्या मंडळाची खोटी माहिती अपलोड करीत असून जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये या पोस्ट व्हायरल केले जात असल्याने मंडळाकडे याबाबत विचारणा होऊ लागली असल्याची माहिती समोर आली आहे. यातून यंदाचे १०० वे वर्षे साजरे करीत असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या मंडळाची देखील सुटका झालेली नाही. सध्या मंडळाच्या टीशर्ट विक्रीत घोटाळा झाल्याची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून मंडळाने ही याबाबत डोक्याला हात लावले आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी प्रमाणेच मुंबईतील इतर ही अनेक मंडळांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना जाणीवपूर्वक ट्रोलिंग केले जात असल्याचे अनेक तक्रारी वाढत असल्याची माहिती मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाई करणार

- Advertisement -

याबाबत चिंचपोकळीच्या चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संदीप परब ‘आपलं महानगर’शी बोलताना म्हणाले की, सध्या सोशल मीडिया वर फिरत असलेली पोस्ट आमच्या निदर्शनास आली आहे . पोस्ट खरंच निंदनीय आहे. शिवीगाळ केली असा आरोप मंडळावर थेट करण्यात आला आहे व हाणामारीची भाषा मंडळाचा वतीने वापरण्यात आली असा उल्लेख आहे. वास्तविक आमच्याकडे हा खोटेपणा सिद्ध करण्यास रीतसर पुरावे आहेत व याची रीतसर कारवाई करण्याचे ठरवले आहे. कोणी धमकी दिली कोणी नाही हे सिद्ध आम्ही करूच. तसेच मंडळाचे पदाधिकारी हे नफा कमावण्यासाठी बसले आहेत हे बिनबुडाचे आरोप आहेत व मंडळाच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांनी असे विधान वापरले नाही व त्यांच्या प्रामाणिकपणावर केलेले आरोप यांची गंभीर दखल घेऊन मंडळाची नाहक बदनामी करून खोडसाळपणे पोस्ट करणार्‍या अज्ञात इसमाविरुद्ध सायबर गुन्हे शाखेत तक्रार करण्याचे मंडळाच्या तातडीच्या सभेत ठरले असून तशी तक्रार देखील आम्ही देणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -