घरमुंबईपनवेलला अमली पदार्थांचा विळखा

पनवेलला अमली पदार्थांचा विळखा

Subscribe

हुक्का पार्लर्सवर पोलिसांची नजर

अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल शहरातून तब्बल 47 लाखांचा गांजा व चरस साठा हस्तगत केल्याने अखेर पनवेल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ का येतात आणि कुठे जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हुक्का पॉटमध्ये फ्लेवर तंबाखूसोबत गांजा जाळून त्याचे व्यसन केले जात असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी अशा हुक्का पार्लरवर करडी नजर ठेवली आहे.

नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तळोजे या सिडको वसाहतीमध्ये पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. मात्र, सिगारेट विक्रीस बंदी नाही. हुक्का हा सिगारेट अ‍ॅक्टखाली येतो. एखाद्या ठिकाणी 30 पेक्षा जास्त खुर्च्या टाकून हुक्का विक्री करता येतो. फक्त तेथे स्मोकिंग झोन/चेंबर करावे लागते. तीस संख्येच्या आत खुर्च्या असतील तर हुक्का विक्री करण्यास परवानगी नाही. कायद्यानुसार सिगारेटचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करता येत नाही. केल्यास 200 रुपये दंड भरावा लागतो. याच दंडाचा कायदा हुक्का सार्वजनिक ठिकाणी ओढताना लागू होतो. दुसरे म्हणजे एफडीएच्या कायद्यात केवळ अन्न पदार्थ व्यवसायालाच परवानगी देण्याची तरतूद आहे.

- Advertisement -

हुक्का पार्लरसाठी परवानगीची तरतूद नाही. किशोरवयीन आणि तरुण मुलांमध्ये हुक्क्याविषयी कुतूहल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तरण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे.हुक्क्यामध्ये 50 पेक्षा जास्त फ्लेवर्स उपलब्ध आहेत. त्यातील अनेक फ्लेवर्सचा वास येत नाही. त्यामुळे पाल्यांनी हुक्का ओढल्याची माहिती पालकांना समजत नाही. हुक्क्याचे हे फ्लेवर्स आणि त्यासाठी लागणारे साहित्य शहरातील पान टपर्‍यांवर सहज विकले जात आहे. त्यामुळे शिक्षण व नोकरीनिमित्त एकटे राहणार्‍या तरुणांच्या सदनिकांमध्येही हुक्क्याचे साहित्य आणून व्यसन पुरे केले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हुक्का पार्लरसंदर्भात कायदा अपुरा असल्याने पोलिसांना कारवाई करताना काही प्रमाणात मर्यादा येतात.

अमली पदार्थांसाठी कोडवर्ड
ऑनलाइन मिळणारे अमली पदार्थ ही मुंबई पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. सांकेतिक भाषेत त्याचे व्यवहार चालतात. त्यासाठी प्रत्येक अमली पदार्थासाठी एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला आहे. कोकेनसाठी कोक, गांजासाठी वीड, हशीशसाठी हसत, एमडीसाठी बुक या सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात येतो. हुक्क्याचे विविध फ्लेवर आणि त्यासाठी लागणारे साहित्य (चारकोल, पॉट, पेपर) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध आहे. आघाडीच्या ऑनलाइन कंपन्या अगदी सवलतीच्या दरात विविध प्रकारचे हुक्क्याचे फ्लेवर्स आणि आकर्षक पॉट विकत आहेत. हुक्क्याच्या दहा फ्लेवसचे पॅकही अगदी 299 पासून 999 रुपयांपर्यत उपलब्ध आहे, तर हुक्काप्रेमींकडून सर्वाधिक मागणी ही ऑरेंज किफ, लेव्हेंडर मिंट, रुट बिअर, सारट्रस आईस, स्टोन मिंट, पिच, पिअर चिल, व्हाईट गमी बिअर या फ्लेवरला सर्वाधिक मागणी आहे.

- Advertisement -

परिमंडळ 2 मध्ये हुक्का पार्लर पूर्णपणे बंद करण्यात आले असून, कोठेही ते सुरू नाहीत.अशाप्रकारची जर माहिती मिळाली तर त्वरित कारवाई होते. त्यामुळे आजमितीस तरी एकही हुक्का पार्लर सुरू नाही.
अशोक दुधे, उपायुक्त, परिमंडळ 2, नवी मुंबई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -