घरमुंबईआमदारांना शपथ देणे हा महाविकासआघाडीचा पोरखेळ - अॅड. आशिष शेलार

आमदारांना शपथ देणे हा महाविकासआघाडीचा पोरखेळ – अॅड. आशिष शेलार

Subscribe

रंगशारदा येथे आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीने त्यांच्या नव नियुक्त आमदारांना एकत्र आणत आज सायंकाळी शपथ दिली. यावर भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा हा पोरखेळ असल्याची टिका केली आहे. आमदारांना शपथ देऊन, ओळखपरेड करुन विधानसभेतील विश्वासदर्शक संख्याबळ सिद्ध होत नाही, असे म्हटले आहे. रंगशारदा येथे आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले अॅड. आशिष शेलार?

मागील दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. त्यातच भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकत्र आल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या आमदारांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ केली. दरम्यान आज महाविकासआघाडीने त्यांच्या आमदारांना हॉटेल ग्रँड हयात येथे शपथ दिली. यावर भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “महाविकास आघाडीने आज त्यांच्या आमदारांना शपथ दिली. त्यांना शपथ दिली. पण महाविकासआघाडीने केलेला हा पोरखेळ आहे. त्यांनी केलेल्या या ओळखपरेडने विधानसभेतील संख्याबळ सिद्ध होत नाही. त्यामुळे आत्मविश्वास गमावलेल्या नेत्याचं आत्मबळ वाढवण्याचा हा टुकार प्रयत्न होता,” अशी टिका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, “आजच्या ओळखपरेडमध्ये त्यांचाच फोटोग्राफर होता. त्यांचा फोटो होता. पण या फोटोफिनीशिंगचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच करतील.” असे बोलून १६५ आमदारांचा कांगावा करणाऱ्या महाविकासआघाडीकडे १४५ आमदार तरी होते का? असा संभ्रमात टाकणारा प्रश्नदेखील अॅड. आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -