घरCORONA UPDATEGood News ! मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

Good News ! मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यात येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची तिसरी लाट उद्धवणार असा अंदाज व्यक्त होत आहे. या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव लहान मुलांवर जाणवेल असेही सांगितले जात होते. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबई पालिकेना लहान मुलांना होणार धोका लक्षात घेता एक सेरो सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये कोरोनाविरोधी अँटीबॉडीज आढळल्या आहे. त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

मुंबई महानगरापालिकेने मुंबईतील २४ वॉर्डमध्ये मे आणि जून महिन्यात ६ ते १८ वयोगटातील एकूण १० हजार मुलांचा सर्व्हे केला. लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे वर्तवले जात असल्याने पालिकेने हा सेरो सर्व्हे केला होता. यात मुंबईतील बहुतांश लहान मुलांमध्य्ये गेल्या चार ते पाच महिन्यात कोरोनाविरोधातील रोगरप्रतिकार शक्ती तयार झाली असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून त्यांच्या सुरक्षित बचाव होणार आहे. असे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

यात मे आणि जून महिन्यादरम्यान ६ ते १८ वयोगटातील एकूण १० हजार मुलांचे नमुने घेण्यात आले होते. मुंबई महापालिकेच्या या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडी आढळल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -