घरताज्या घडामोडीवाद पेटला : ट्विटरची भारताच्या नकाशासोबत छेडछाड, लडाखला दाखवला वेगळा देश

वाद पेटला : ट्विटरची भारताच्या नकाशासोबत छेडछाड, लडाखला दाखवला वेगळा देश

Subscribe

नकाशा कोणी अपलोड केला आहे याचा तपास सुरु

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरसोबत केंद्र सरकारच्या वादात आता ठिणगी पडल्याचे दिसते आहे. ट्विटरने केलेल्या हरकतीमुळे केंद्र सरकार कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. पहिल्यापासूनच ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये नियमावलीवरुन वाद सुरु असताना ट्विटरनं भारतातील लडाख क्षेत्रालाच वेगळा देश दाखवल्यामुळे आता ट्विटरच्या अडचणी वाढणार आहे. ट्विटरच्या वेबसाईटने भारताच्या नकाशामध्ये छेडछाड(Twitter tampers with India’s map) केली आहे. यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखला वेगळा देश म्हणून दाखवले गेले. ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ट्विटरवरच नेटकऱ्यांनी ट्विट करत ट्रोल केलं आहे.

केंद्र सरकारने या घटनेची माहिती घेतली आहे. शासकीय माहितीच्या आधारे केंद्र सरकार याबाबत माहिती घेत आहे. नकाशामध्ये बदल करण्यात आला आहे का? हा नकाशा वेबसाईटवर कधी टाकण्यात आला. नकाशा बदलण्यामागचे कारण, कोणी केले? कोणत्या लोकांनी ट्विटरला हा नकाशा दिला तसेच हा नकाशा कोणी अपलोड केला आहे याचा तपास सुरु असून केंद्र सरकार कठोर कारवाई करण्याची शक्यता आङे.

- Advertisement -

ट्विटरच्या पृष्ठावर ट्विट लाईफ विभागात जगाचा नकाशा आहे. या नकाशावर कंपनी कुठे कुठे स्थापित करण्यात आले असल्याचे दाखवण्यात आले आहे. या नकाशामध्ये भारत देखील आहे परंतु हा नकाशामुळे वाद निर्माण झाला आहे. यापुर्वी भारताचा भाग म्हणून लडाखला दाखवण्यात येत नव्हते परंतु आता तो भारतात दाखवण्यात आला आहे. ट्विटर भारत सरकारशी वाद निर्माण करत असले तर केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इशारा दिला आहे की, जर ट्विटरच्या हरकती बदल्या नाही तर ट्विटरला भारतात बॅन करण्यात येईल.

केंद्रीय मंत्र्यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक

ट्विटरने दोन ते तीन दिवसांपुर्वी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर अकाउंटच ब्लॉक केलं होतं. रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करुन माहिती दिली होती. ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना पुर्वकल्पना न देता १ तासांसाठी लॉगइन(log in access denied) येण्यास परवानगी नाकारली होती. परंतु तासाभरानंतर ट्विटरने परवानगी दिली गेली यानंतर रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करुन माहिती दिली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -