घरमुंबईआदिवासी, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य; मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे

आदिवासी, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य; मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन मागे

Subscribe

आदिवासी, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने मोर्चेकरांनी आंदोलन मागे घेतले आहे.

महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यातून तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज आंदोलन केले होते. हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर करण्यात आले. लोकसंघर्ष मोर्चाने या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले असून या मोर्चाला ‘उलगुलान मोर्चा’ असे नाव देण्यात आले. मात्र आता या मोर्चेकरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात असून त्याबद्दल लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली असल्याचे समोर आले आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

आदिवासींनी विविध मागण्या सरकारकडे केल्या होत्या. या मागण्या सरकारने मान्य केल्या असून आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलती दिल्या जाणार आहेत. तर शेतीसाठी खवटी अनुदान देण्याबद्दलही निर्णय झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या आंदोलनात गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढ्यांच्या रहिवासाची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील या मोर्चात करण्यात आली होती. याबाबत राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार असल्याचं सरकारने सांगितले आहे. तर वन्य जमीन प्रकरणातले ८० टक्के दावे सरकारने फेटाळले होते. तर या दाव्यांचं सरकारकडून पुनरावलोकन केलं जाणार आहे. सर्व दावेदारांची नावं स्वतंत्र सातबारावर चढवली जाणार आहेत.

- Advertisement -

संबंधित बातमी – 

वाचा – शेतकरी-आदीवासींच्या ‘उलगुलान मोर्चा’चा नेमका अर्थ काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -