घरमुंबईसरकारने संगीताचे म्युझियम उभारावे

सरकारने संगीताचे म्युझियम उभारावे

Subscribe

संगीतकार-अमितराज…

मतदानासाठी बाहेर पडा, कोणत्याही मोहाला बळी पडू नका. जाहिरातीच्या माध्यमातून सरकार असे सांगत असले तरी आता मतदार सुजाण झालेला आहे. अस जरी आपण मानले तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या काही दिवस अगोदर दिशाभूल करणार्‍या अनेक गोष्टी परिसरात होत असतात. अफवा पसरवल्या जातात, टीका व्यक्त केली जाते.

- Advertisement -

माझे मतदारांना सांगणे आहे की आपण स्वत: निर्णय घेऊ शकता इतका सुजाणपणा तुमच्यात आहे. चांगला व्यक्ती निवडणे हे आपल्या हाती आहे. तसे सर्वांकडून झाले तर आपल्याला अपेक्षीत कामेही विजयी उमेदवाराकडून होतील. उमेदवाराबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. तुमचा अचूक निर्णय समाजाबरोबर राज्याचा परिणामी राष्ट्राचा विकास करू शकतो. मी स्वत: गायक, संगीतकार असल्यामुळे सत्तेवर येणार्‍या सरकारकडून माझ्या थोड्याशा अपेक्षा आहेत.

जुने चित्रपट वेगवगळ्या कंपन्यांनी संग्रहित केलेले आहेत. तसा संग्रह गाण्यांचाही पहायला मिळतो. यु-ट्यूबवर त्याचा आनंदही घेता येतो, तरीपण संगीताकडे थोडेसे संकोची वृत्तीने पाहिले जाते. संगीत आवडत नाही असा माणूस जगभरात सापडणे कठीण आहे. मनोरंजनाचा एक घटक म्हणून जुन्या-नव्या गाण्यांचे म्युझियम उभारायला हवे. तसे वातावरण निर्माण केले तर संगीतशौकीन या म्युझियमचा आनंद घेतील. नव्या सरकारने याकडे लक्ष केंद्रीत करावे असे मला वाटते.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -