घरमुंबईआफ्रिकन पाहुण्यांना जीपीओची भुरळ

आफ्रिकन पाहुण्यांना जीपीओची भुरळ

Subscribe

काळाघोडामध्येही मोहर उमटणार

मुंबई सीएसटीपासून ते थेट गेट वे ऑफ इंडियाला निघणारे भुयार, गोल घुमट, विशिष्ट फुलांचे नक्षीकाम आणि कार्यालयीन कामकाज सुरू असताना जीपीओ पाहण्याचा अनुभव देणारा जीपीओच्या वॉकला आता विदेशातून पाहुणे येणार आहेत.मुंबई जीपीओने सुरू केलेल्या हेरीटेज वॉकसाठी आता थेट ईस्ट आफ्रिकातून पाहुणे येणार आहेत.

मुंबई जीपीओने पर्यटन विभागाच्या मदतीने जीपीओ हेरीटेज वॉकला सुरूवात केली जाणार आहे. आतापर्यंत मुंबईतील अनेक गाईड्सने या हेरीटेज वॉकला उपस्थिती दाखवली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनाही जीपीओची सफर भारतीय डाक सप्ताहाच्या निमित्ताने करवण्यात आली होती. येत्या २१ डिसेंबरला टेक्सटाईल मंत्रालयाच्या पुढाकाराने ईस्ट आफ्रिकन उद्योजक मुंबईत येणार आहेत. त्यांच्या दौर्‍यात जीपीओचा वॉकदेखील समाविष्ट आहे.

- Advertisement -

काळाघोडामध्ये जीपीओची छाप
मुंबईकरांसाठी आकर्षण असणार्‍या काला घोडा फेस्टिव्हलमध्येही मुंबई जीपीओची छाप पहायला मिळणार आहे. यंदाच्या कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये मुंबई जीपीओचा माहिती देणारा स्टॉल असणार आहे. त्यामध्ये जीपीओच्या हेरीटेज वॉकबाबतची माहिती देण्यात येईल. अधिकाधिक लोकांना कामकाज चालणारे असे पोस्टाचे कार्यालय पाहता यावे हा यामागचा उद्देश असल्याचे मुंबई जीपीओचे पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -