घरमुंबईदेशातील गर्भश्रीमंतांच्या संपत्तीत दिवसाला २,२०० कोटींची वाढ

देशातील गर्भश्रीमंतांच्या संपत्तीत दिवसाला २,२०० कोटींची वाढ

Subscribe

भारतातील अब्जोपतींची संपत्ती गेल्या वर्षी दरदिवशी २,२०० कोटी रुपयांनी वाढली असून देशात एक टक्काही नसलेल्या या श्रीमंतांची श्रीमंती ३९ टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसर्‍या बाजूला आर्थिकदृष्ठ्यात तळाला असलेल्या भारतीयांची संपत्ती फक्त ३ टक्क्यांनी वाढली असल्याचे ऑक्सफेम या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.जागतिक स्तरावर अब्जाधीशांची संपत्तीत २०१८ मध्ये १२ टक्क्यांची किंवा दरदिवशी २.५ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. तर जगभरातील गरीबांच्या संपत्तीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क ग्रुप ऑक्सफेमच्या अहवालात म्हटले आहे. स्वीझर्लंण्ड येथे होणार्‍या पाच दिवशी जागतिक आर्थिक परिषदेच्या पाच दिवस अगोदर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

१३.६ कोटी भारतीय २००४ पासून कर्जात बुडाले आहेत. या १३.६ कोटी भारतीयांमध्ये १० टक्के लोक हे देशातील सर्वात जास्त गरीबांमध्ये मोडले जातात. धनाढ्य आणि गरीबांमधील ही वाढती दरी गरीबीविरोधातील लढाई अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी आहे. यामुळे जगभरात लोकांच्या भावना अधिक उग्र होऊ शकतात, असे ऑक्सफेमने अहवालात म्हटले आहे.जागतिक आर्थिक परिषदेनिमित्त उपस्थित राहणार्‍या राजकीय नेत्यांना आणि उद्योगपतींना श्रीमंती व गरीबीतील दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती ऑक्सफेमने केली आहे. गरीबी व श्रीमंतीमधील दरीने अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. तसेच जगभरातील जनतेत असंतोष निर्माण होत असल्याचे ऑक्सफेमने म्हटले आहे. जगातील सर्वात श्रीमंत आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची संपत्ती ११२ अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यांच्या संपत्तीचा एक टक्का हा युथोपिया देशाच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पाएवढा आहे.

- Advertisement -

देशातील १० टक्के लोकसंख्येकडे देशाच्या एकूण संपत्तीचा ७७.४ टक्के हिस्सा आहे. तर या १० टक्क्यांमधल्या एक टक्के लोकसंख्येकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५१.५३ टक्के हिस्सा आहे. देशातील ६० टक्के लोकसंख्येकडे देशाच्या संपत्तीचा ४.८ टक्के हिस्सा आहे. देशात २०१८ ते २०२२ दरम्यान रोज ७० नवीन कोट्याधीश होणार असल्याचे ऑक्सफॅमने म्हटले आहे. ऑक्सफॅम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर म्हणाले, की सरकार आरोग्य सेवा, शिक्षण आणि सार्वजनिक सेवांसाठी कमी आर्थिक तरतूद करत आहे. यातून असमानता वाढत असल्याचे सर्वेतून दिसून आले आहे. तर दुसरीकडे कंपनी आणि श्रीमंतांवर कमी कर लावण्यात आला आहे. तसेच करचोरी रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. गेल्या वर्षी देशात नवीन १८ अब्जाधीश झाले आहेत. त्यामुळे देशात एकूण ११९ अब्जाधीश झाले आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक विनी ब्यानिमा म्हणाले, की देशात गरीब हे दोन वेळचे जेवण आणि मुलांच्या औषधासाठी संघर्ष करत आहेत. तर देशातील श्रीमंतांची संपत्ती वरचेवर वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास सामाजिक व लोकशाही व्यवस्था उद्धवस्त होईल, अशी त्यांनी भीती व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -