घरCORONA UPDATEकोरोनावर आयुर्वेदिकचा मारा!

कोरोनावर आयुर्वेदिकचा मारा!

Subscribe

आतापर्यंत जी-उत्तर व के-पश्चिम विभागांमध्ये या औषधांचे  मोफत वितरण करण्यास सार्वजनिक आरोग्य खात्याने मान्यता दिली आहे.

आयुष मंत्रालय दिल्ली यंनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये कोरोना कोविड -१९च्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अर्सेनिक अल्बम ३०च्या औषधांचा वापर केल्यास त्याचा फायदा होत असल्याचे नमुद केले आहे. त्यानुसार या औषधांचे वाटप नागरिकांना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत जी-उत्तर व के-पश्चिम विभागांमध्ये या औषधांचे  मोफत वितरण करण्यास सार्वजनिक आरोग्य खात्याने मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या कार्यकारी आरेाग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी ८ मे रोजी महापालिकेच्या जी-उत्तर व के-पश्चिम विभागात अशाप्रकारच्या औषधांचे वितरण नागरिकांना करून त्यांचा पुर्तता अहवाल या कार्यालयास देण्यात यावा, असे वितरण संस्थेला कळवले आहे. तसेच या औषधांचे वितरण करताना हे औषधे किती प्रमाणात व कोणत्याही घ्यायची आहे याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात यावे, असेही आवाहन केले आहे. या औषधांचे वितरण करताना संबंधित सहायक आयुक्त सोबत संबंधित वितरण करणाऱ्या कंपनीला समन्वय राखणण्यास कळवले आहे.

- Advertisement -

आयुष मंत्रालय दिल्ली यंनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये कोरोना कोविड- १९च्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून अर्सेनिक अल्बम ३०च्या औषधांचा वापर केल्यास त्याचा फायदा होत असल्याचे नमुद केले आहे. या अनुषंगाने या औषधांचे वितरण करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजूरी प्राप्त करण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या पत्रानुसार अर्सेनिक अल्बम ३० हे औषध बनवून घेण्यापासून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोफत वितरण करण्यासाठी जो निधी लागेल तो तुम्ही स्वत:च्या स्तरावर प्रयत्न करून त्याचे जी-उत्तर व के-पश्चिम  विभागातील नागरिकांना वितरीत करून त्याचा पुर्तता अहवाल या कार्यालयात देण्यात यावा, असे आरझू स्वाभिमान नागरी समितीला कळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -