घरCORONA UPDATEअजून प्रशासन किती जणांचे बळी घेणार?

अजून प्रशासन किती जणांचे बळी घेणार?

Subscribe

मंत्रालयातील कर्मचारी वर्क फ्रॉर्म होम आणि महापालिकेची कर्मचारी यू कम आऊट फ्रॉम होम आणि जॉईन ड्युटी असा भेदभाव का अशी विचारणा करत अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी प्रशासनाला हवेत असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता व विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दिक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आता संताप अनावर होवू लागला आहे. मंत्रालयातील कर्मचारी वर्क फ्रॉर्म होम आणि महापालिकेची कर्मचारी यू कम आऊट फ्रॉम होम आणि जॉईन ड्युटी असा भेदभाव का अशी विचारणा करत अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी प्रशासनाला हवेत असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या समाज माध्यमावर अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे १९०० हून अधिक कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. त्यातील आतापर्यंत ६० टक्क्यांहून अधिक कर्मचारी बरे होवून घरी परतले आहेत, तर काहींवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ५५ हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. जी-उत्तर विभागातील करनिर्धारण व संकलन विभागातील विभाग निरिक्षक यांचा कोरोनामुळे पहिला बळी गेला होता. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याचे सत्र सुरुच आहे. आतापर्यंत घनकचरा व्यवस्थापन, मुंबई अग्निशमन दल, सुरक्षा खाते आदी खात्यांच्या सर्वाधिक कामगार, कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर दोनच दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रभारी उपायुक्त व पाणी प्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता असलेल्या शिरीष दिक्षित यांचाही मृत्यू झाला. दिक्षित यांनी जलविभागातच नव्हेतर कोस्टल रोडमध्येही महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच गारगाई पाणी प्रकल्पाला गती देण्याचे काम ते करत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसत आहे.

- Advertisement -

महापालिकेत दीड लाख कर्मचारी होते, तेव्हा मुंबईची लोकसंख्या एक कोटीच्या आसपासहोती. गेल्या दहा पंधरा वर्षात त्यातील सुमारे ५० हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले. आता एक लाखाच्या आसपास कर्मचारी आहेत आणि मुंबईची लोकसंख्या जवळपास दोन कोटी झाली आहे. या एक लाखांमध्ये ६० टक्के कामगार आहेत. या एक लाखांमधील ८० टक्के कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. आता ८० दिवस झालेत. मुंबईतील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्यासर्व सेवा नियमितपणे, बिनबोभाट चालू आहेत आणि त्यात मुंबईतील कोरोनाची पूर्ण जबाबदारी  महापालिकेच्या खांद्यावर दिली आहे आणि आपलेवैद्यकीय कर्मचारी, अभियंते आणि कामगार प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. आजवर ५५ ते ५६ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला. दोन हजारांच्यावर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपचार घेत आहेत. प्रशासन, मीडिया कोरोनाच्या आकडेवारीत मग्न आहे. आज थाळ्या वाजविणारे  आणि दिवे लावणारे गेले कुठे? साधी दखलही कुणी घेत नाही, अशी पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे आणि याला सर्वच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -