घरताज्या घडामोडीदेशातील सिंहांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती

देशातील सिंहांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती

Subscribe

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आणि गुजरातमधील लोकांचं कौतुक केलं.

देशात सिंहांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे. सिंहांच्या फोटोंसह मोदींनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, ‘गुजरातच्या गीर जंगलात आशियाई सिंहांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. सिंहांच्या जगण्याची टक्केवारीत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.’ या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी गुजरातमधील लोकांचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या ट्विटमध्ये असं म्हटलं की, गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे. लोकांच्या योगदान, तंत्रज्ञानाचा वापर, वन्यजीवांची काळजी आणि त्यांच्या योग्य वास्तव्याच्या व्यवस्थापनाचा हा परिणाम आहे. पुढे देखील सिंहांची संख्या अशी वाढत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिके व्यतिरिक्त गीर नॅशनल पार्क हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जेथे आशियाई सिंहाची संख्या वाढत आहे. गीर जंगलात आशियाई सिंहांना सर्वत्र सहजतेने पाहिले जाऊ शकतात. ४१२ किलोमीटर पसरलेल्या गीर नॅशनल पार्कमध्ये सिंहांच्या संवर्धनासाठी अभूतपूर्व काम केलं गेलं आहे. गुजरात सरकार आणि वन विभागाने आशियाई सिंहांच्या कुळात भरभराट करण्यासाठी एकत्र काम करत आहे. यामुळे अलीकडच्या वर्षांत सिंहांच्या संख्येत वाढत होताना दिसत आहे.


हेही वाचा – पाकिस्तानात कोरोनाचा कहर; WHOने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा दिला इशारा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -