घरमुंबईGokhale Bridge : गोखले पुलाच्या कामात पालिकेकडून चूक; चालक वैतागले, जबाबदारी कोण...

Gokhale Bridge : गोखले पुलाच्या कामात पालिकेकडून चूक; चालक वैतागले, जबाबदारी कोण घेणार?

Subscribe

गेल्या दीड वर्षात गोखले पुलाचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका आपली पाठ थोपटून घेत आहे. परंतु, गोखले आणि बर्फीवाला हे दोन्ही पूल न जोडल्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित गोखले पुलाचा एक भाग उशीरा का होईना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, ते कामही नीट न झाल्याने या पुलावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. गोखले पूल खुला केल्यानंतरी अंधेरी पश्चिम येथील सीडी बर्फीवाला पुलाचे मोजमाप योग्यरित्या न केल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोखले पूल जोडताना उंचीचा मोठा फरक झालेला आहे. या पुलात तब्बल 2 मीटरचे अंतर आहे. महापालिकेकडून झालेल्या निष्काळजी कारभारामुळे सर्व स्तरातून टीका होत आहे.

दीड वर्षात गोखले पुलाचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका आपली पाठ थोपटून घेत आहे. वास्तविक, हे काम फारच लांबल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आता देखील पूल सुरू झाला आहे, पण काम नीट झालेले नाही. गोखले आणि बर्फीवाला हे दोन्ही पूल न जोडल्यामुळे नागरिकांकडून महापालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोखले पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याची खोटी माहिती दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री हे आयुक्त आणि पालकमंत्र्यांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

जो रस्ता जुहू सर्कल येथून अंधेरी पूर्वेला जातो. पण बर्फीवाला पूल हा गोखले पुलाला जोडू शकत नाही. कारण गोखले पूल आणि बर्फीवाला पूल या दोघांमध्ये जवळपास दोन मीटरचा फरक आहे. महापालिका, एमएमआरडीए, राज्य सरकार आणि रेल्वे हे सर्वजण नेमके काय करत होते? असा सवाल स्थानिक नागरिकांडून केला जात आहे.

आयुक्तांनी राजीनामा द्यावा; आदित्य ठाकरे

गोखले पुलाच्या उंचीवरून विरोधकांना विधानसभेत सरकारला धारेवर धरले आहे. यावर उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “गोखले पुलाचे बांधकाम उशिरा झाले. दोन पालकमंत्री जाऊन या पुलाचे उद्घाटन करतात. त्यावेळी पालिका आयुक्त चहल सांगतात की, आम्ही विश्वविक्रम केला आहे. या पुलाच्या बांधकामात मोठी चूक केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी विधानसभेत केली आहे.”

- Advertisement -

मी अजून वाट बघू शकत नाही -वरुण गौरव

गोखले पुलाच्या बांधकामात झालेल्या चुकांवर स्टँड अप कॉमेडियन वरुण गौरव यांनी देखील मश्किल टिप्पणी केली आहे. वरुण गौरव म्हणाले, “गोखले पुलाचा एक भाग चार वर्षापूर्वीच पडला होता. सर्वात जास्त ट्रॅफिक असणारा हा पूल आहे. हा पूल बांधायला अडीच वर्षे लागली. पण हा पूल तयार केल्यानंतर कळाले की, तो गोखले पूल आणि बर्फीवाला पुलामध्ये बरेच अंतर असल्याचे पूल बांधल्यानंतर कळले. आपल्या देशात आपण 10 वर्षात 10 कोटी इंजीनिअर तयार केले आहेत. पण आता ते म्हणतात की, हा पूल पुन्हा बांधणार आहे. पण मी त्यांना सांगेन की, नको मी उडी मारून जाईन. कारण मी अजून वाट बघू शकत नाही.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -