घरमुंबई"I" लई Important नाहीतर...; अमोल कोल्हे यांनी ईदच्या दिल्या मिश्किल शुभेच्छा

“I” लई Important नाहीतर…; अमोल कोल्हे यांनी ईदच्या दिल्या मिश्किल शुभेच्छा

Subscribe

मुंबई : देशभरात आज मोठ्या प्रमाणावर ईद आणि अक्षय्य तृतीया सम मोठ्या प्रमाणावर साजरी होत असताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांनी ईदच्या मिश्किल शब्दात शुभेच्छा दिल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहे.

अमोल कोल्हे जेवढे चांगले अभिनेते आहेत, तेवढेच ते चांगले राजकाणीही आहेत. अभिनयाची आवड जोपासत जनतेची सेवा करण्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांनी आज ईद आणि अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केल्या आहेत, पण त्यांनी ईडी संदर्भ देताना ईदच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनीही त्यांच्या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

- Advertisement -

रमजानचा पवित्र महिना आज संपला असून देशभरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी होत आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुस्लिम बांधवाना प्रत्येकजण ईदच्या शुभेच्छा देत आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak असं लिहिलं.. “I” लई Important… नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E’i’d Mubarak!” अशी पोस्ट खासदार कोल्हे यांनी पोस्ट करत ईडी आणि सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात विरोधी पक्षावर ईडीच्या धाडी पडत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेते केंद्र सरकारवर आगपाखड करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -