घरमुंबईआयआयटी शालेय विद्यार्थ्यांना बनवणार 'सोलर लॅम्प' अॅम्बेसिडर

आयआयटी शालेय विद्यार्थ्यांना बनवणार ‘सोलर लॅम्प’ अॅम्बेसिडर

Subscribe

आयआयटी मुंबईने बनवलेल्या सोलर लॅम्पने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. राज्यातच नव्हे तर देशभरातूनही या लॅम्प्सची मागणी होत आहे. आयआयटी मुंबईने ५००० विद्यार्थ्यांना या सोलर लॅम्पचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच विद्यार्थ्यांची “स्टुडन्स्ट सोलर अम्बॅसिडर” वर्कशॉपअंतर्गत अ‍ॅम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली. हे लॅम्प आर्थिकदृष्ठ्या परवडणारे आहेत. देशात ग्रामीण भागात विजेची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्यांवर पर्याय म्हणून मुंबई आयआयटीच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अँड इंजिनियरिंगचे प्राध्यापक चेतन सोलंकी यांनी या लॅम्पची संकल्पना मांडली होती.

शालेय विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण
येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधीच्या १५० वी जयंतीचे औचित्य साधून मुंबईतील ५ हजार शालेय विद्यार्थ्यांना हा सोलर लॅम्प बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता मुंबईतील ८०-१०० शाळांमधून प्रत्येकी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. भारत सोलर ऊर्जेचा वापर करणारा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. या उपक्रमाव्दारे येत्या काळात भारत पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याची तयारी करत आहे. या उपक्रमासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ सोलर लॅम्प शोधापुरते मर्यादित न ठेवता तो बिघडल्यावर रिपेअर देखील कसा करावा, याचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. देशभरात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सोलर लॅम्प प्रकल्पाचा फायदा देशाला होईलच पण ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना त्याचा उपयोग घेता येईल. या प्रयोगाने देशाला नव्या वाटा मिळतील, अशी अपेक्षा आहे. – चेतन सोलंकी, प्राचार्य, डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्स अँड इंजिनियरिंग

आयआयटी मुंबईने सुरू केलेल्या या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. विद्यार्थ्यांना देखील यातून भरपूर काही शिकता येईल. याआधी आमच्या शाळेत यासाठी एक कार्यशाळाही घेण्यात आली होती. असंख्य विद्यार्थी यात सहभागी होऊ चाहत होते. पण मर्यादा असल्याने केवळ ५० विद्यार्थ्यांची निवड करावी लागते आहे, हे काम अवघड आहे. – अर्चना भागावत, प्राचार्य, केंद्रीय विद्यालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -