घरक्रीडाश्रीलंकन क्रिकेटर गुनथिलाकावर ६ सामन्यांची बंदी

श्रीलंकन क्रिकेटर गुनथिलाकावर ६ सामन्यांची बंदी

Subscribe

श्रीलंकेचा सलामीवीर दनुश्का गुनथिलाकाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने सहा सामन्यांसाठी बंदी घातली आहे. त्याचसोबत गुनथिलाका याला वार्षिक उत्पन्नातील २० टक्के रक्कम ही गमवावी लागली आहे.

श्रीलंकेचा बॅट्समन गुनथिलाका याच्या हॉटेल रूममध्ये त्याच्या मित्राने एका नॉर्वेच्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्याला देण्यात आलेली रूम इतरांना वापरायला दिल्याने खेळाच्या आचार संहितेचे उल्लंघन गुनथिलाकाकडून करण्यात आले असल्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने गुनथिलाकावर ६ सामन्यांची बंदी घातली असून त्यासोबतच त्याला त्याच्या वार्षिक उत्पन्नातील २० टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. २७ वर्षीय गुनथिलाकाचा २६ वर्षीय मित्र संदीप सेलियाह याने मंगळवारी पोलीस चौकशीनंतर आपला गुन्हा कबूल केला असून यानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बलात्कार प्रकरणात गुनथिलाका निर्दोष

रविवारी सकाळी गुनथिलाका (२७) आणि त्याचा मित्र संदीप (२६) त्यांच्या दोन नॉर्वेच्या मैत्रिणींना घेऊन हॉटेल रूमवर आले. त्यानंतर गुनथिलाकाचा मित्र संदीपने त्यातल्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेकडून करण्यात आला. त्यानंतर लगेचच पोलिसांकडून संदीपला अटक करण्यात आली आणि पुढील चौकशीनंतर आचार संहितेचे उल्लघंन केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत गुनथिलाकावर ६ सामन्यांची बंदी घालण्यात आली. सोबतच त्याला आपल्या वार्षिक उत्पन्नातील २० टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार असल्याचे आदेशही श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून दिले गेले आहेत.

- Advertisement -

याआधीही गुनथिलाकावर बंदी

गुनथिलाकाला दक्षिण आफ्रिकेविरूद्धचे पुढील पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीही गुनथिलाकावर त्याच्या नियम तोडण्याच्या चुकीमुळे अनेक वेळा बंदी घातली गेली आहे. जानेवारी २०१८ मध्ये बांग्लादेश, श्रीलंका आणि झिम्बाम्बे यांच्यात झालेल्या तिरंगी मालिकेतही आयसीसीच्या कलम – १ अंतर्गत गुन्ह्यासाठीही गुनथिलाकाला शिक्षा आणि निगेटिव्ह पॉईंट देण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -