घरमुंबईप्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लवकरच बदल्या

प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लवकरच बदल्या

Subscribe

बेकायदा बांधकाम प्रकरणे भोवणार

उल्हासनगर मनपाच्या चारही प्रभागांचे अधिकारी आणि कर्मचारी अनधिकृत बांधकामांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून लवकरच या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. मनपा आयुक्त गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबत नुकतीच एक आढावा बैठक घेण्यात आली आहे.

- Advertisement -

अनधिकृत बांधकामे आणि त्यात होणारा भ्रष्टाचार

मागील काही दिवसांपासून उल्हासनगर महानगरपालिकेच्या चार प्रभागांमधील अनधिकृत बांधकामे आणि त्यात होणारा भ्रष्टाचार याबाबत होत असलेल्या आरोपांमुळे मनपा प्रशासनाची नाचक्की झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त गणेश पाटील यांनी पदभार सांभाळला होता. पदभार सांभाळताच काही दिवसानंतरच ते एका महिन्याच्या सुट्टीवर गेले होते. त्यामुळे प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण राहिले नव्हते. शहरात चारही प्रभागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली गेली आहेत. कल्याण-अंबरनाथ रस्त्यालगत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

- Advertisement -

अधिकारी आणि कर्मचारी रडारवर

महापालिका आयुक्त गणेश पाटील रजेहून परत येताच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रभारी पदभार मिळालेल्या वादग्रस्त अधिकारी युवराज भदाणे यांचा पदभार त्वरित काढून घेतला. त्यानंतर फाईलचोरी प्रकरणात असलेला नगरसेवक प्रदीप रामचंदानी याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांच्या तत्परतेमुळेच रामचंदानी याच्याविरुद्ध कठोर कारवाई शक्य झाली असल्याची चर्चा शहरात होत आहे.
आयुक्त गणेश पाटील यांच्या रडारवर आता बेकायदा आणि नियमबाह्य कामे करणारे प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वर्षानुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली करण्याचा निर्णय आयुक्त घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

 

बेकायदा आणि नियमबाह्य कामे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहेत. यात प्रभाग अधिकारी, बिट मुकादम आणि कर्मचारी यांची बदली करण्याचा निर्णय घेतला जाईल. बीट मुकादम यांची बदली लॉटरी पद्धतीने होणार आहे.
– संतोष देहरकर, मुख्यालय उपायुक्त, उल्हासनगर महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -