घरमुंबईसीओपीडीने वाढतं मृत्यूचे प्रमाण

सीओपीडीने वाढतं मृत्यूचे प्रमाण

Subscribe

हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आजार आणि पॅरेलेसिससारख्या आजारांपेक्षांही सीओपीडीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक असल्याचे समोर आले आहे.

‘सीओपीडी’ म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज या आजाराचे प्रमाण वाढत आहे. या फुप्फुसांच्या आजारामुळे रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाणही अलिककडच्या काळात वाढले असून १९९० साली मृत्यूंच्या कारणांत सहाव्या क्रमांकावर असणारा हा आजार २०३० पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर येण्याच्या मार्गावर असल्याची भीती फुप्फुस आणि छाती विकार तज्ज्ञ व्यक्त करतात.

हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आजार आणि पॅरेलेसिससारख्या आजारांपेक्षांही सीओपीडीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. तसेच, या आजाराला मुंबईत वाढणारे प्रदूषण कारणीभूत आहे, असे ही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रदूषण बेततंय जीवावर

श्वसनाच्या आजारातील सर्दी, खोकला, दमासारखाच सीओपीडी श्वसन रोग आहे. सीओपीडी आजार धुम्रपान आणि हानिकारक वायुच्या दीर्घकाळ संपर्कात आल्यामुळे होतो. स्वस्त असलेल्या बीडीच्या धुम्रपानाने सीओपीडी विकार होत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही बायोमास इंधनाच्या धुराचा धोका हा जागतिक पातळीवर सीओपीडी सारखा आजार वाढवणारा आहे.  – डॉ. राजेंद्र ननावरे, फुप्फुस आणि छाती विकार तज्ज्ञ

जगभरात तीनशे करोड व्यक्ती या बायोमास इंधनाच्या धुराच्या सानिध्यात येतात. भारतात ७० टक्के घरांमध्ये बायोमास इंधन वापरले जाते. घरातील कोंदट वातावरणामुळे धुराचा दुष्परिणाम होत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कमी आणि मध्यम उत्पन्न देशांमधील ९० टक्के रुग्णांचा सीओपीडीने मृत्यू झाल्याची माहितीही डॉ. ननावरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

सीओपीडीची लक्षणे

वय ४० पेक्षा जास्त असल्यावर दीर्घकाळ खोकला राहून बडके किंवा थुंकी येणे, कमी वयात जास्त दम लागणे.
निदान – रक्ताच्या चाचण्या करणे, त्यामध्ये साखरेचे प्रमाण, किडनी कार्यक्षमता पाहणे, आणि शरीरात फुप्फुसाच्या आजाराचा प्रादुर्भाव आणि हिमोग्लोबिनचे रक्तातले प्रमाण, छातीचा एक्सरे, पीएफटी या सारख्या चाचण्या करुन फुप्फुसाची कार्यक्षमता तपासली जाते. यावर उपचार म्हणून इनहेल पंप आणि त्यासोबत औषधे दिली जातात. तसेच, धुम्रपान न करणे, बायोमास इंधन उदा. शेणी, लाकडे, पालापाचोळा न वापरणे, किंवा ते हवेशीर जागेत वापरणे हे ही प्रतिबंधात्मक पद्धती आहे.


हेही वाचा – वाहनचालकांनी १० दिवसात दंड न भरल्यास होणार अटक


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -