घरमुंबईठाण्यात गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी

ठाण्यात गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी

Subscribe

ठाण्यातील एका दुमजली इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ठाण्यातील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची घटना आज, सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गॅलरीतून जात असलेली महिला गॅलरीसकटखाली कोसळ्याने गंभीर जखमी झाली आहे. अक्रम शेख (४५) असे या महिलेचे नाव असून त्यांना तात्काळ उपचाराकरता मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

ठाण्यातील राबोडी भागातील तळ अधिक दोन मजल्याची अमर सदन या इमारतीच्या गॅलरीचा काही भाग आज सकाळच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या घटनेत गॅलरीसकट खाली कोसळलेल्या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या पाठिला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेत गॅलरी खाली जात असताना वरील बाजूस लाटकत राहिली होती. सुदैवाने त्यांना सुरक्षितपणे खाली काढण्यात आले आहे.

- Advertisement -

ही इमारत दोन मजल्यांची असून ती ४५ वर्षे जुनी आहे. या इमारतीत एकूण १६ रुम आहेत. मात्र, ही इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमध्ये तीन ते चार रहिवासी वास्तव्याला होते. सकाळच्या सुमारास अक्रम शेख ही महिला गॅलरीतून जात होती. तर जैनब रियाज शेख (४५) ही महिला देखील त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित होती. त्याचवेळेस गॅलरीचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली.


हेही वाचा – वाहनचालकांनी १० दिवसात दंड न भरल्यास होणार अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -