घरमुंबईमुंबईतील लॉकडाऊनमुळे Kitchen Appliances च्या मागणीत वाढ - Flipkart

मुंबईतील लॉकडाऊनमुळे Kitchen Appliances च्या मागणीत वाढ – Flipkart

Subscribe

घरात राहाण्याचा कालावधी वाढल्यामुळे मुंबईत स्वयंपाकघरातील विशेष उपकरणांच्या मागणीत वाढ

गेल्या वर्षी कोव्हिड १९च्या प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे सर्वाधिक लोकांचे work from home सुरू होते. या लॉकडाऊन दरम्यान, देशभरात स्वयंपाकघरातील काही उपकरणांसाठीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अधिकाधिक ग्राहक घराबाहेर पडण्यास अद्याप तयार झाले नसल्याने घरीच विविध खाद्यप्रकार बनवण्याचे प्रयोग करताना दिसताय. अशा प्रकारच्या खास उपकरणांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे सांगितले जात आहे.  फ्लिपकार्ट या भारतातील ई कॉमर्स बाजारपेठेवरील माहितीनुसार, इलेक्ट्रिक तंदूर, हँड ब्लेंडर, वॅफल मेकर्स, पिझ्झा मेकर्स, पॉपकॉर्न मेकर्स, कॉटन कँडी मेकर्स आधी स्वयंपाकघरातील खास उपकरणांसाठीच्या मागणीत २०२१ मधील सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये गतवर्षातील याच काळाच्या तुलनेत तब्बल २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मुंबईतील मागणीत गतवर्षीपेक्षा १३८ टक्के वाढ झाली आहे.

या कालावधीत रेफ्रिजरेटर्स, ज्यूसर मिक्सर ग्राइंडर, ओटीजी आधी नेहमीच्या सर्वसाधारण देशभरातही उपकरणांसाठीची मागणीही ५२ टक्क्यांनी वाढली आहे. मेट्रो शहरांमधून मागणीचे प्रमाण उच्च आहेच, पण द्वितीय व तृतीय पातळीवरील शहरांमधील या उपकरणांचा वाटा पहिल्या काही महिन्यांत ५५ टक्क्यांनी वाढला असून गतवर्षीच्या याच कालवधीच्या तुलनेत ही वाढ दुप्पट आहे. यामुळे अनेक नामवंत ब्रँड्स स्वयंपाकघरातील उपकरणांच्या श्रेणीत अनेक नवी उत्पादने आणत असून नव्या उत्पादनांचे प्रमाणही दुपटीने वाढले आहे. विशेष म्हणजे गुंटुर, कोट्टायम, आगरतळा, कचर, मेदिनिपूर, मुझफ्फरपूर, भागलपूर आणि बांकुरा या शहरांमध्ये अतिविशिष्ट उपकरणांसाठीच्या मागणीत सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.

- Advertisement -

ग्राहकांच्या या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी फ्लिपकार्टच्या व्यासपीठावर स्वयंपाकघरातील नियमित व अतिविशिष्ट उपकरणांच्या श्रेणीत वैविध्यपूर्ण निवडीला वाव आहे. या उपकरणांमुळे ग्राहकांना जलदरित्या स्वयंपाक करणे, नव्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे प्रयोग करून बघणे आणि आरोग्यदायी पदार्थ बनवण्याचे विविध पर्याय आजमावणे शक्य होते.

या संदर्भात फ्लिपकार्टच्या लार्ज अप्लायन्सेस विभागाचे उपाध्यक्ष हरी जी. कुमार म्हणाले, “ग्राहक आणि आपले खासगी आयुष्य यात योग्य संतुलन साधण्याच्या प्रयत्नांत सक्षम पर्यायांच्या शोधात असल्यामुळे देशभरात संपूर्णत: कार्यान्वित अशा स्वयंपाकघराच्या संकल्पनेने आता चांगले मूळ धरले आहे. यामुळे स्वयंपाकघरातील छोट्या आणि मोठ्या उपकरणांच्या मागणीला चालना मिळाली आहे, खाण्यासाठी घराबाहेर पडण्यापेक्षा पर्याय म्हणून ग्राहक अतिविशिष्ट उपकरणांवर भर देत आहेत. त्यामुळे आमच्या व्यासपीठावर २०२१ च्या पहिल्या काही महिन्यांत या उपकरणांच्या मागणीत २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. मेट्रो आणि बिगरमेट्रो अशा दोन्ही श्रेणींतील शहरांमध्ये तुलनेने समसमानरित्या ही वाढ असली तरी बिगरमेट्रो शहरांमध्ये वाढीचे प्रमाण अधिक आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजांचे अचूक भान असलेली एतद्देशीय कंपनी या नात्याने आम्ही देशभरातील ग्राहकांना किफायतशीर किमतीत श्रेणीतील सर्वोत्तम असे तंत्रज्ञानाधारित सोल्युशन्स उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या भागिदारांसह सातत्याने एकत्र काम करत आहोत.”

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -