घरट्रेंडिंगसमुद्र चौपाट्यांवरील दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेत वाढ

समुद्र चौपाट्यांवरील दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेत वाढ

Subscribe

जुहू चौपाटी (Juhu Chowpati) येथील समुद्रात मंगळवारी पोहायला गेलेल्या चेंबूर (Chembur), वाशी नाका (Vashi Naka) येथील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

जुहू चौपाटी (Juhu Chowpati) येथील समुद्रात मंगळवारी पोहायला गेलेल्या चेंबूर (Chembur), वाशी नाका (Vashi Naka) येथील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता पालिकेने (BMC) मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू आदी महत्वाच्या चौपाट्यांच्या ठिकाणी अधिक चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जीवरक्षक, अग्निशमन दल, पोलीस पेट्रोलिंग यांची संख्या व गस्त वाढविण्यात आली आहे. (Increased safety measures to prevent accidents on sea lanes)

यासंदर्भात पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास चेंबूर, वाशी नाका येथील चारजण जुहू चौपाटी येथील समुद्रात पोहायला गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे तैनात लाईफ गार्डने हटकले होते. मात्र त्यानंतरही ते चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले व खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सुदैवाने त्यापैकी एकजण वाचला. मात्र परेश व कौस्तुभ या सख्ख्या भावांसह तिघांचा दुर्दैवी अंत झाला.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका सुसज्ज, 3 तास अगोदर मिळणार ‘अलर्ट’ मेसेज

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा तैनात

- Advertisement -

मुंबईत या पावसाळ्यात चार महिन्यात २२ दिवस समुद्रात मोठी भरती असून त्यावेळी समुद्रात साडेचार मिटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्याचवेळी जर अतिवृष्टी झाल्यास मुंबईत सखल भागात पाणी साचून जलमय स्थिती निर्माण होऊ शकते. पालिकेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक यंत्रणा तैनात करण्याचे नियोजन अगोदरच केले आहे. मात्र आता जुहू चौपाटी येथील दुर्घटनेनंतर जुहू, गिरगाव, दादर आदी महत्वाच्या चौपाट्यांच्या ठिकाणी असलेली सुरक्षायंत्रणा, लाईफगार्ड हे रडारवर आले आहे. पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुहू चौपाटी येथील या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

समुद्र चौपाट्यांच्या ठिकाणी लाईफ गार्ड

सदर घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच समुद्र चौपाट्यांच्या ठिकाणी लाईफ गार्ड यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनाही पेट्रोलिंग वाढविण्याच्या सूचना तात्काळ देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाला कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ मदतीसाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, मुंबईत फ्लड रेस्क्यू टीमही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तैनात करण्यात आली आहे.


हेही वाचा – नागपूरच्या एटीएममध्ये ५०० आकडा टाकल्यावर बाहेर आले २५०० रुपये; धनलाभ घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -