घरट्रेंडिंगनागपूरच्या एटीएममध्ये ५०० आकडा टाकल्यावर बाहेर आले २५०० रुपये; धनलाभ घेण्यासाठी नागरिकांची...

नागपूरच्या एटीएममध्ये ५०० आकडा टाकल्यावर बाहेर आले २५०० रुपये; धनलाभ घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग

Subscribe

अचानक आपल्यासोबत चांगली घटना घडली की, आपण नशिब फळफळले असे म्हणतो आणि देवाचे नाव घेतो. नशिब होते म्हणून काम झाले असेही अनेकदा आपण बोलतो. असाच काहीसा प्रत्यय नागपुरात (Nagpur) एका तरुणाला आला आहे.

अचानक आपल्यासोबत चांगली घटना घडली की, आपण नशिब फळफळले असे म्हणतो आणि देवाचे नाव घेतो. नशिब होते म्हणून काम झाले असेही अनेकदा आपण बोलतो. असाच काहीसा प्रत्यय नागपुरात (Nagpur) एका तरुणाला आला आहे. एका तरुणाला अचानक धनलाभ झाला आहे. धनलाभ त्याला एटीएमच्या (ATM) माध्यमातून झाला असून, याघटनेची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. (nagpur atm withdraws more money)

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला होता. त्यावेळी त्याने एटीएम कार्डच्या माध्यमातून एटीएममधून ५०० रुपयांचा आकडा टाकला. त्यानंतर अधिक पैसे विड्रॉ झाले. म्हणजेच ५०० टाकल्यानंतर एटीएममधून २५०० रुपये बाहेर आले. अचानक एवढे पैसे आल्यामुळे तो तरुण काही काळ आश्चर्यचकीत झाला आणि त्याने याबाबत गावभर दवंडी पिठवली.

- Advertisement -

त्यानंतर गावात एटीएममधून जास्त पैसे बाहेर आल्याचे समजताच अनेकांनी थेट एटीएम गाठले. धनलाभ देणाऱ्या अॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) एटीएममधून खरोखरच ५०० रुपयांचा आकडा टाकल्यानंतरही २५०० रुपये बाहेर पडत होते. याबाबत काही काळानंतर धनलाभ देणाऱ्या एटीएमची माहिती पोलिसांना आणि बँकेच्या अधिकार्‍यांना मिळाली. मात्र, तोपर्यंत अनेक तरुणांनी पैसे काढल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी एटीएम गाठून एटीएमचे शटर बंद केले.

दरम्यान, या घटनेमुळे अनेकांना हेरा फेरीमधील बाबू भैय्याच्या त्या डायलॉगची आठवण झाली. तो म्हणजे “उपरवाला छप्पर फाडकर देता है”.

- Advertisement -

हेही वाचा – लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाचे ‘मिशन ४५’; सर्व जागा जिंकायच्याच, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -