घरमुंबईजेनेटिक तपासणी करून घेण्यास भारतीय उदासीन

जेनेटिक तपासणी करून घेण्यास भारतीय उदासीन

Subscribe

एखादा जेनेटिक धोका आणि आपण जगत असलेली प्रतिकूल जीवनशैली हे दोन घटक एखाद्या व्यक्तीला एनसीडी होण्याचा धोका वाढवू शकतात.

जेनेटिक तपासणीतून मानवी शरीरप्रकाराचे विश्लेषण आणि जुळणी करता येते. तसेच यातून आरोग्य सल्ले मिळण्यासाठी मदत होते. या तंत्रज्ञानाने गंभीर आजार कितपत घातकी असू शकतो, याचा अंदाज करण्यास तज्ज्ञांना मदत होते. रूग्णाला आहार आणि औषधाचे नियोजन ही ठरवता येऊ शकते. पण, भारतात जेनेटिक तपासणीकडे सर्वात कमी कल दिसून येत असल्याने तज्ज्ञ नाराजी व्यक्त करत आहेत. सोबतच वैयक्तीत जेनेटिक तपासणी करुन घेण्याची सध्या गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

यासाठी करावी जेनेटिक तपासणी

उपचारांसाठी जेनेटिक तपासणी कधीच करून घेतली जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६ अहवालातील अंदाजानुसार, असंसर्गजन्य रोगांमुळे भारतात साधारण ६० लाख मृत्यू होतात. म्हणजेच एकूण मृत्यूपैकी ६३ टक्के प्रमाण आहे. जेनेटिक्स, जीवनशैली, स्वभाव आणि वागण्याची पद्धत, वातावरणीय घटक, वय, शरीरविज्ञान, चयापचय इत्यादींची नोंद घेणे अत्यावश्यक आहे. जेनेटिक्स हा धोकादायक घटकांमधील बदलता न येण्याजोगा मुख्य घटक आहे. एखाद्या व्यक्तीचे आरोग्य हे जेनेटिक्स आणि काही इतर घटकांवर अवलंबून असते. ज्यात बदल घडवून आणता येतील असे धोकादायक घटक म्हणजे जीवनशैली किंवा स्वभाव. याच घटकांतील विशेष करून आहार आणि खाण्यापिण्याच्या सवयी तसेच शारीरिक तंदुरुस्तीच्या पातळ्या एनसीडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात मदत करतात, असे आरोग्य तज्ज्ञ अमोल नाईकवडे यांनी सांगितले.

- Advertisement -

जेनेटिक तपासणी महत्वाची

एखादा जेनेटिक धोका आणि आपण जगत असलेली प्रतिकूल जीवनशैली हे दोन घटक एखाद्या व्यक्तीला एनसीडी होण्याचा धोका वाढवू शकतात. व्यक्तिगत जेनेटिक तपासणीत, या रोगाशी संबंधित असलेल्या बीआरसीए १, बीआरसीए २ आणि इतर जीन्सच्या धोकादायक घटकांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती शोधून काढण्याचा समावेश असतो. त्यामुळे, जेनेटिक तपासणी करुन घेणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -