घरमुंबईखासगी कंत्राटदारामुळे रुग्णांचे कपडे धुण्यास उशीर

खासगी कंत्राटदारामुळे रुग्णांचे कपडे धुण्यास उशीर

Subscribe

पालिकेच्या लाँड्रीमधील रिक्त पदे भरण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणार्‍या कपडे धुण्याच्या लाँड्रीमधील कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. यामुळे रुग्णालयात लागणारे कपडे बाहेरून खासगी कंत्राटदाराकडून धुवून घ्यावे लागत आहेत. कपडे धुवून परत येण्यास उशीर लागत आहेत. त्यामुळे लाँड्रीमधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे. खासगी कंत्राटदारांना जास्त पैसे देण्यापेक्षा पालिकेच्या शाळा सफाईची कामे दिलेल्या संस्थाप्रमाणे संस्थांची नेमणूक करावी,अशी मागणी केली जात आहे.

पालिकेच्या सायन रुग्णालयात मागील महिन्यात रुग्णांनी रुग्णालयातील कपडे न घातल्याने ४० जणांचे ऑपरेशन रद्द करण्यात आले होते. रुग्णालयातील कपडे न घातल्याने ऑपरेशन रद्द केल्याच्या प्रकाराचे पडसाद पालिकेत उमटले. लाँड्रीमध्ये कपडे वेळेवर धुतले जात नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याबाबत मागील वर्षी नगरसेवकांनी पालिका सभागृहात ६६ ब नुसार चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी प्रशासनाकडून याची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन देऊनही वर्षभरानंतरही त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात लागणार्‍या बेडशीट, रुग्णांना देण्यात येणारे युनिफॉर्म आदी कपडे धुण्यासाठी १९६५ मध्ये परेल भोईवाडा येथे लाँड्रीची स्थापना करण्यात आली. या लाँड्रीमध्ये कपडे धुण्याच्या १० मशीन आहेत. लाँड्रीमधून दिवसाला १६ हजार कपडे धुतले जातात. पालिकेच्या लाँड्रीमधील शेवटची भरती १९९२ ला करण्यात आली होती. गेल्या २६ वर्षात नवीन पदांची भरती करण्यात आली नाही. एकूण ८३ कर्मचार्‍यांची गरज असताना सध्या ४८ कर्मचारी कार्यरत असल्याने सध्या लाँड्रीमध्ये दोन शिफ्टमध्येही काम चालत नाही.

पालिकेच्या लाँड्रीमध्ये कर्मचारी नसल्याने १६ हजार कपड्यांऐवजी ८ हजार कपडेच धुतले जात आहेत. इतर कपडे बाहेरून खासगी कंत्राटदाराकडून जास्त पैसे देऊन धुवून घ्यावे लागत आहेत. यामुळे रुग्णालयात लागणारे कपडे वेळेवर पोहचत नाहीत. परिणामी सायन रुग्णालयासारखे प्रकार अन्य रुग्णालयातही घडत असून रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांचा त्रास कमी होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आय.ए. कुंदन यांची भेट घेतली असून लाँड्रीमध्ये अत्याधुनिक मशीन आणण्याची आणि रिक्त पदे भरण्याची मागणी केल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -