घरमुंबईगृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही - जयंत पाटील

गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही – जयंत पाटील

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री मंडळातीन अनेकांवर आरोप झाले

महाराष्ट्राध्ये पंढरपूरला पोटनिवडणूक आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री आणि मी(जयंत पाटील) सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पंढरपर गेलो होतो. पोटनिवडणुकच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांशी झालेल्या चर्चेबाबत दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांचे मुद्दे सादर केले आणि पक्ष म्हणून काही निर्णय घेतले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. तसेच गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी तब्बल अडीच तासाची बैठक सुरु होती. या बैठकीत पंढरपूर पोटनिवडणूक बाबत चर्चा झाली असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच पक्ष म्हणून काही निर्णय घेण्यात आले आहेत. परतु राज्यातील मीत्र पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करु असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राची एटीएस आणि एनआयए चौकशी करत आहे. या चौकशीतून काही ना काही योग्य गोष्टी बाहेर येतील. राज्यात जे गुन्हे झाले आहेत त्यामध्ये योग्य तपास सुरु आहे. लवकरच याचा खुलासा होईल दोषींवर कारवाई केली जाईल असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच गृहमंत्र्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. हा जो प्रमुख मुद्दा आहे. जी घटना झाली आहे त्यावरुन लक्ष विचलित करण्याचे कोणतेही कारण नाही. मनसुख हत्या प्रकरण आणि अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटकं प्रकरण यावर सरकारचा प्रामुख्याने लक्ष आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री मंडळातीन अनेकांवर आरोप झाले त्यांना राजीनामा फडणवीसांनी द्यायला लावला नाही. परंतु त्याबाबतीत मी खोलात जाणार नाही. परंतु प्रकरणांवरील घटनांमधून लक्ष विचलित करण्याचा प्रश्न उद्भवत असेल तर तेही होता कामा नये असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -