घरमुंबईJet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, 'या' प्रकरणी EDकडून कारवाई

Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक, ‘या’ प्रकरणी EDकडून कारवाई

Subscribe

जेट एअरवेजचे संस्थापक असलेले नरेश गोयल यांच्यावरच ईडीने कारवाईचा बडगा उभारला असल्याचे पाहायला मिळालेले आहे. करोडो रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडीकडून नरेश गोयल यांना अटक करण्यात आलेली आहे.

मुंबई : केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर ED ॲक्शन मोडवर आलेली आहे. गेल्या काही वर्षात ईडीने घोटाळेबाजांवर कारवाई करत करोडोंची मालमत्ता जप्त केलेली आहे. ज्यामुळे ईडीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. परंतु आता जेट एअरवेजचे संस्थापक असलेले नरेश गोयल यांच्यावरच ईडीने कारवाईचा बडगा उभारला असल्याचे पाहायला मिळालेले आहे. करोडो रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडीकडून नरेश गोयल यांना अटक करण्यात आलेली आहे. तब्बल 538 कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप नरेश गोयल यांच्यावर करण्यात आलेला आहे. (Jet Airways founder Naresh Goyal arrested by ED in bank fraud case )

हेही वाचा – Jawan चित्रपटातील ‘त्या’ संवादावर समीर वानखेडेंकडून शाहरुखला सडेतोड उत्तर

- Advertisement -

नरेश गोयल यांना ईडीकडून अटक करण्यापूर्वी त्यांची काही तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज नरेश गोयल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी 5 मे रोजी गोयल यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयांमध्ये धाडी टाकत कारवाई केलेली होती. त्यावेळी मुंबईतील सात ठिकाणी सीबीआयकडून झडती घेण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड (जेआयएल) ला 848.86 कोटी रुपयांची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केले होते. त्यातील काही रक्कम ही फेडण्यात आली असून अद्यापही उर्वरित रक्कम जेट एअरवेजकडून फेडण्यात आलेली नाही. त्यामूळे बँकेकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यात आला, त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकबाकी असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

जेट एअरवेजचे खाते बँकेने 5 जून 2019 मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार 538 कोटी 62 लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढ्या रकमेचे बँकेचे नुकसान झाले. याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता, बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप बँकेने तक्रारीत केला आहे.

कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच CBI ने याप्रकरणी 3 मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी 23 नोव्हेंबर 2022 ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने नरेश गोयल यांच्या मुंबईतील सात ठिकाणांची झडती घेतली होती. त्या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून तपास करण्यात आला. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -