घरमनोरंजनJawan चित्रपटातील 'त्या' संवादावर समीर वानखेडेंकडून शाहरुखला सडेतोड उत्तर

Jawan चित्रपटातील ‘त्या’ संवादावर समीर वानखेडेंकडून शाहरुखला सडेतोड उत्तर

Subscribe

मुंबई : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर अखेर गुरुवारी (31 ऑगस्ट) प्रदर्शित झाला. साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक Atlee यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय शाहरुखचे चाहतेही त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये शाहरुख खानसह सर्व स्टार्स दमदार संवाद आहेत. यातीलच एक संवाद इंटरनेटवर दहशत निर्माण करताना दिसत आहे. ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ या संवादातून शाहरुखने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर निशाणा साधल्याचे मानले जात आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांनीही शाहरुख खानला सडेतोड उत्तर दिले आहे. (Sameer Wankhedes reply to Shah Rukh on that dialogue in the movie Jawan)

समीर वानखेडे यांनी शाहरुख खानवर निशाणा साधताना ट्विट करत निकोल लियॉन्सबद्दल यांचा एक विचार शेअर केला आहे. ट्वीटमध्ये म्हटले की, “मी आग चाटली आहे आणि मी जळलेल्या प्रत्येक पुलाच्या राखेवर नाचलो आहे. मी तुला घाबरत नाही.” समीर वानखेडे यांच्या या ट्वीटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. यातून वानखेडेने शाहरुखला चोख प्रत्युत्तर दिल्याचे युजर्सचे मत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विकी कौशल बनला ‘भजनकुमार’

इंटरनेटवर सुरू असलेले हे शीतयुद्ध गुरुवारी (31 ऑगस्ट) जवान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित रिलीज झाल्यानंतर सुरू झाले. दोन मिनिटं पंचेचाळीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये हा शाहरुख खान वडील आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसत असून तो वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हा चित्रपटातील संवाद. आर्यन खान आणि कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्यामध्ये समीर वानखेडेचा सहभाग होता.

- Advertisement -

हेही वाचा – Movie Review: प्रेरणादायी लव्ह ऑल

काय आहे कॉर्डेलिया क्रूझ प्रकरण?

2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर अटक केली होती. मात्र, नंतर या प्रकरणात वानखेडेचे नावही चर्चेत आले. आर्यन खानकडून लाच मागितल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मे 2023 मध्ये शाहरुख खान आणि एनसीबीचे माजी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील संभाषणाचे WhatsApp chat समोर आले होते.

WhatsApp chat मध्ये काय होते?

आर्यन खानच्या अटकेच्या 10 दिवसांनंतर 14 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या चॅटमध्ये शाहरुखने WhatsApp chat वर वानखेडे यांनी विनंती केली होती की, “तू चांगला माणूस आहेस. कृपया माझ्या मुलावर दया कर. माणूस म्हणून माझा मुलगा तुटून जाईल. वडील म्हणून तुझ्याकडे भीक मागतो आणि विनवणी करतो. तू माझ्या मुलाला सुधारशील असे वचन दिले होते. तू जे करत आहेस त्यावर मी कधीच उभा राहणार नाही. माझा फक्त तुझ्या चांगुलपणावर विश्वास आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -