घरदेश-विदेशJitendra Awhad : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सुनावलं; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Jitendra Awhad : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सुनावलं; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Subscribe

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. असे असतानाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आलं. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयतील न्यायधीशांनी अजित पवार गटाला सुनावल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते नवी दिल्लीतून माध्यमांशी बोलत होते. (Jitendra Awhad Supreme Court hears Ajit Pawar group Jitendra Awhads claim)

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. असे असतानाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आलं. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला की, निवडणूक आयोगाने आम्हाला तात्पुरते नाव दिले आहे. काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नंतर निवडणुकांची तयारी सुरू होईल. आम्ही नाव आणि चिन्हाशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे आम्हाला दिलेलं नाव कायम ठेवा आणि चिन्ह द्या, असा युक्तीवाद मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यावर कोर्टाने हा निकाल दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Waris Pathan : एमआयएम नेते वारिस पठाण पोलिसांच्या ताब्यात! नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र आव्हाडांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार

शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी अजित पवार गटाला उद्देशून लोकांना मूर्ख समजू नका, अशा शब्दांत सुनावलं. दहाव्या शेड्यूलचा धज्जा उडाला हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं. त्यांच्या वकिलांशी न्यायाधीश युक्तिवाद करत होते. आम्हाला आनंद झाला की, लोकशाही मुल्यांचा आदर राखला पाहिजे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला. मी सुप्रीम कोर्टाचा अत्यंत आभारी आहे असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Farmer Protest : किसान मोर्चाने सरकारचा प्रस्ताव फेटाळला; चौथ्या दिवशीही चर्चा निष्फळ

न्यायाधीशांनी केला पाकिस्तानचा उल्लेख

झालेल्या सुनावणीबाबत माहिती देताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, राजकारणाशी निगडीत व्यक्ती नाव आणि पक्षाच्या चिन्हाशिवाय ओळखली जाईल हे कसे शक्य आहे? असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तुम्हाला काय करायचं आहे. सीमेपलीकडे (पाकिस्तान) काय झाले ते पाहिले नाही का? बॅट (इमरान खान यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह) काढून घेण्यात आलं आणि काय झाले? मला माफ करा पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान पाकिस्तानचा उल्लेख केला असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -