घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव टँकरच्या धडकेत तरुणी ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव टँकरच्या धडकेत तरुणी ठार

Subscribe

पंचवटीतील अमृतधाम चौफुलीजवळ एका भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१७) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. अपघातस्थळी वाहनचालकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी टँकरचालकास अटक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अश्विनी पंडीत शेजवळ (वय २३, रा. अंबर बिल्डिंगमागे, एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद) असे मृत तरुणीची नाव आहे. राजाराम भगीरथ सिंग (वय ५८, रा. तुळसीपुरा, ता. मुरेना, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी शेजवळ या स्कुटीवरून तारवालानगर सिग्नलकडून अमृतधाम चौकात आल्या. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पंचवटी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी जखमी अवस्थेत अश्विनी शेजवळ हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस अंमलदार गावीत करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -