घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रइमारतीच्या डबक्यामधील गोणीत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

इमारतीच्या डबक्यामधील गोणीत आढळला बेपत्ता महिलेचा मृतदेह

Subscribe

नाशिकरोड एकलहरे परिसरात सिडकोच्या युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच दुसर्‍या दिवशी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोणीमध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. उपनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील डबक्यात गोणीत एका बेपत्ता २३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोनाली भानुदास काळे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गालगत एलआयसी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये सोनाली काळे यांचा मृतदेह आढळून आला. मृत सोनाली यांच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलीस तपास करत होते. सोमवारी (दि.19) सकाळी या इमारतीच्या तळमजल्यावरील एका डबक्याच्या गोणीत सोनाली यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात असून, त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, घटनास्थळी धाव घेतली, गुन्हे शोध पथक व कर्मचा-यांनी पंचनामा करुन महिलेचे शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.

पोलिसांनी घेतले चौघांना ताब्यात

महिलेचा पती, सासू-सासरे, दीर व त्याची बायको यांचे सोनालीसोबत नेहमीच भांडण होत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी काळे कुटुंबातील चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -