घरमुंबईमहापालिकेच्या तिजोरीची चावी कोण पटकावणार?

महापालिकेच्या तिजोरीची चावी कोण पटकावणार?

Subscribe

केडीएमसीत प्रथमच भाजपने थोपटले सेनेविरोधात दंड n आज सभापतीपदाची निवडणूक

कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक गुरुवार 3 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता महापालिका भवन कल्याण येथे होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रथमच भाजपने शिवसेनेविरोधात दंड थोपटल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडे काठावरचे बहुमत असून मनसेची भूमिकाही निर्णायक ठरू शकते. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीची चावी केाण पटकावणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थानापन्न झाल्यानंतर शिवसेना भाजपमध्ये दरार निर्माण झाली असली तरीसुध्दा आजही केडीएमसीत शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे. मात्र, स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे गणेश कोट आणि भाजपचे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. स्थायी समितीत शिवसेनेचे 8 आणि काँग्रेस 1 असे 9 सदस्य आहेत, तर भाजपचे 7 सदस्य असून मनसेचा 1 सदस्य आहे. शिवसेनेकडे अवघ्या एका मताचे बहुमत आहे. तसेच मनसेची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

स्थायी समितीत शिवसेनेचे वर्चस्व असले तरी उमेदवारी वाटपावरून सेनेतील गटबाजी चांगलीच उफाळून बाहेर आली होती. त्यामुळे सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे हे नाराज असून मानसिक धक्क्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे म्हात्रे निवडणुकीला उपस्थित राहणार का? असाही प्रश्न आहे. जर आजारपणामुळे म्हात्रे यांना निवडणुकीला उपस्थित राहता आले नाही तर मग शिवसेनेचे एक मत कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच मनसेची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मनसे तटस्थतेची भूमिका घेते की, शिवसेना अथवा भाजपला सहकार्य करते याकडेही लक्ष वेधले आहे. काँग्रेसचा एकमेव सदस्य आहे त्यामुळे काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेना गॅसवर आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक ही शिवसेनेसाठी अस्तित्वाची ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -