घरमहाराष्ट्रनागपूरमला भीती आहे की गडकरींच्या विरोधातही CBIचा होईल वापर..., कन्हैया कुमारांचा टोला

मला भीती आहे की गडकरींच्या विरोधातही CBIचा होईल वापर…, कन्हैया कुमारांचा टोला

Subscribe

नागपूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त नागपुरात टेन्को रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना कन्हैया कुमारनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरुन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. जे या देशाला विकत आहेत, त्यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे. ज्या लोकांना या देशाला वाचवायचे आहे ते लोकच देश विकणाऱ्यांना शुद्धीवर आणतील, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मला तर भीती वाटत आहे की कधी नितीन गडकरींच्या विरोधातही CBI चा वापर होईल, असा टोलाही भाजपला लगावला.

अग्नीपथ योजनेवर टीका –

- Advertisement -

अग्नीपथ योजनेवरुन कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर टीका केली. केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणे गरजेचे होते. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या, असा आक्रमक पवित्रा त्याने घेतला होता. अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी आणि लॉलीपॉप दाखवायचे बंद करावे. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुले सैन्यात जात नाहीत, अशी घणाघाती टीका कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर केली होती.

मोदींवर टीका –

- Advertisement -

डिसेंबर 2021 मध्ये कन्हैया कुमार काँग्रेसच्या सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपाला उपस्थित होता. त्यावेळी त्याने मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझे मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचे भले होणार, अशी खोचक टीका मोदींवर केली होती.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -