घरमुंबईखार : एच वॉर्डमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

खार : एच वॉर्डमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Subscribe

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्या वतीने 'जीवनातील समस्यासाठी वैज्ञानिक उपाययोजना' या विषयावर आधारित 'एच वॉर्ड' विज्ञान प्रदर्शन २०१८-१९ चे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्या वतीने ‘जीवनातील समस्यासाठी वैज्ञानिक उपाययोजना’ या विषयावर आधारित ‘एच वॉर्ड’ विज्ञान प्रदर्शन २०१८-१९ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान खार पश्चिम येथील सेंट एलायस हायस्कुल येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख अतिथी म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. रवी कुमार यांच्या हस्ते मंगळवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता करण्यात येणार आहे. तर विशेष अतिथी सेंट एलायस हायस्कुलचे व्यवस्थापक फा. ऑस्टिन नॉरीस शिक्षकांकरिता वर्ग व्यवस्थापन या विषयावर दुपारी दोन ते साडे तीन या कालावधीत मार्गदर्शन करतील.

सहशालेय पारितोषिक वितरण बुधवार, १२ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी दोन वाजता प्रमुख अतिथी फाऊंडर ऑफ अँम्पल मिशन डॉ. अनिल मुरारका यांच्या हस्ते करण्यात येईल. तर विद्यार्थ्यांकरिता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या वतीने ‘परिणामकारक सवांद’ या विषयावर सकाळी १० ते ११:३० वाजेच्या दरम्यान विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणारे अभिनेता सुरज थापर व बालकलाकार सनी पवार मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाची सांगता सोहळा गुरुवार १३ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी तीन वाजता प्रमुख अतिथी भाभा अणुसंशोधन केंद्र संचालक (एन. आर.जी) कैलाश अगरवाल आणि विशेष अतिथी शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग अनिल साबळे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून मुख्याध्यापकांकरिता समावेशनाचे महत्व या विषयावर सकाळी १०:३० ते १२ या दरम्यान रेखा विजयकर मार्गदर्शन करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -