घरमुंबईअंबरनाथमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील 3500 कामगार संपावर

अंबरनाथमधील ऑर्डनन्स फॅक्टरीतील 3500 कामगार संपावर

Subscribe

देशातील सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कामगारांनी कालपासून देशव्यापी संप पुकारला असून या संपात अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरीचे 3500 कामगार सहभागी झालेले आहेत. खासगीकरणाला विरोध, जुनी पेन्शन योजना लागू करा अशा विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे.

अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी , एम पी एफ या दोन्ही कारखान्यातील इंटक, आयुध निर्माण मजदूर संघ, ऑर्डनन्स एम्प्लॉइज युनियन, स्वतंत्र मजदूर संघटना या संपात सहभागी झाली आहे . या दोन्ही कारखान्यातील कामकाज पूर्णपणे ठप्प असून सुरक्षा रक्षक देखील या संपात सहभागी झाले आहेत. देशातील जवळपास 40 ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये युद्धसामग्री बनविली जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून खाजगी कंपन्यांना हे कंत्राट दिले जात आहे . हे खाजगीकरण बंद करावे , नवीन पेन्शन योजना रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा तसेच कामगारांना वर्क लोड द्या, अशा विविध मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत .

- Advertisement -

अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी कारखाना आणि कामगार वसाहत हे 850 एकर परिसरात वसलेले आहे . मुंबई पासून अंबरनाथ जवळ असून रेल्वे स्थानकापासून ऑर्डनन्स फॅक्टरी हाकेच्या अंतरावर आहे ,त्यामुळे या जमिनीवर बिल्डरचा डोळा असून सरकार बिल्डरच्या इशार्‍यावर नाचत आहे , विशेष म्हणजे हे वर्ष ऑर्डनन्स फॅक्टरी हिरक महोत्सव म्हणून साजरा करीत असतांना कामगारांवर संकट कोसळले असल्याची खंत कामगारांनी यावेळी व्यक्त केली. येत्या 26 जानेवारी पर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा ईशारा कामगार संघटनांनी दिला आहे . स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी संपकरी कामगारांची भेट घेवून केंद्र सरकारकडे कामगारांच्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -